कोपरगावात चाकणकरांची थेट हाक: तीन तारखेला गुलाल आपलाच 

कोपरगावात चाकणकरांची थेट हाक: तीन तारखेला गुलाल आपलाच 

Direct call from Chakankars in Kopargaon: Gulal is ours on the third day

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचा मुखवटा फाडला: बाहेर टीका ; आत फॉर्म!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 22Nov 18.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगावच्या निवडणूक मैदानात शुक्रवारी सायंकाळी जोमदार प्रचारसभेत रूपाली चाकणकर ताईंनी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा सूरच बदलवणारे भाषण करीत महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर कोपरगावात आल्या आणि अक्षरशः भाषणाची आग पेटवली. 

व्यासपीठावर प्रांताध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे, त्यांच्यासोबत सुहासिनी कोयटे, पद्माकांत कुदळे, कारभारी पा. आगवन यांच्यासह सर्व उमेदवार-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. पण पूर्ण कार्यक्रमाची धार, ताल आणि टेम्पो एका व्यक्तीवरच ठरला, रूपाली ताई चाकणकर

स्वयंपाक सोडून आल्या… म्हणजे कोपरगावात वारे उलटलेत!”

सभेची सुरुवात झाली आणि चाकणकर ताईंनी महिलांना उद्देशून तिखट टोमणा मारला,“सायंकाळची चुल सोडून इथे आल्या म्हणजे हवा कोयटे चाललीय हे स्पष्ट! महिलांचा आवाज म्हणजे कोपरगावचा निकाल!”

विरोधकांची ‘रात्रीची सेवा’ – दिवसा टीका, रात्री फॉर्म!

‘लाडकी बहीण योजना फसवी’ म्हणणाऱ्यांची पोलखोल करताना ताईंनी जणू सर्जिकल स्ट्राईकच केला,  विरोधक रात्रीतून गुपचूप त्या योजनेचे फॉर्म भरत असल्याचा खुलासा करताना  “सार्वजनिक मंचावर ओरडायचं, आणि स्वतःच्या मतदारसंघात बॅनर लावून फॉर्म वाटायचे… हे दुतोंडी राजकारण कोपरगावकरांना खरंच पटेल असं त्यांना वाटतं का?”सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.

साडीला खिसा’—महिलांसाठी सरकारचा थेट हात!

योजनेचा सोपा हिशोब सांगताना ताई म्हणाल्या,“आमच्या महिला हजार मिळाल्या तर नऊशेच खर्च करतात, उरलेलं घराच्या उजेडात. म्हणूनच सरकारने साडीत खिसा दिला आणि त्या खिशात दर महिन्याला दीड हजार रुपये. हा खिसा फक्त पैशाचा नाही— महिलांच्या स्वाभिमानाचा!

महिला उद्योग, व्यवसायांची नवी क्रांती

ताई म्हणाल्या,“या योजनेमुळे हजारो महिला छोटे उद्योग उभे करत आहेत. घरखर्चासाठी नव्हे,तर स्वप्नांसाठी!”

कोपरगावाला हवा ‘आपल्याच घरातील,  माणूस’

स्थानिक प्रश्न, विकास आणि सुशिक्षित नेतृत्व यावर ताईंनी सरळ हल्ला चढवला—
“नगराध्यक्षपदी कोयटेच! कारण“ कोपरगावमध्ये समस्यांकडे नीट पाहणारा आपलाच माणूस हवा!”  बाहेरून आणलेला  नको!”

शेवटचा डायलॉग – सभेला अक्षरशः उठवणारा

समारोपात ताईंनी एकच घोषणा दिली—
“तीन तारखेला गुलाल उडणार… आणि तो गुलाल महिलांच्या विजयाचा असेल! आणि हा आवाज कोपरगाव थांबवू शकणार नाही!”

चौकट :

आ. आशुतोष काळेंचा विरोधकांवर घणाघात

२०१९ मध्ये निवडून आल्यानंतर दोन महिन्यांत पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू केले. शहराचा पाणीप्रश्न सुटू नये म्हणून विरोधक न्यायालयात गेले. मी मंजूर केलेल्या २८ विकासकामांनाही विरोधकांनी स्थगिती आणली, कारण श्रेय मला मिळू नये हीच त्यांची पोटदुखी होती.
या निवडणुकीतही छाननीत सर्व उमेदवारी वैध ठरल्यानंतरच ते न्यायालयात धावले. आजवर मी जे बोलत आलो, तेच त्यांनी सिद्ध केले.”

Leave a Reply

You cannot copy content of this page