नागरिकांच्या अपेक्षा कागदावर नाही, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचं ठोस वचन आम्ही देतो- पराग संधान

नागरिकांच्या अपेक्षा कागदावर नाही, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचं ठोस वचन आम्ही देतो- पराग संधान

Citizens’ expectations are not on paper, we give a concrete promise to translate them into reality – Parag Sandhan

कोपरगावासाठी विश्वास नामा जाहीर

जनतेचा विकास, पारदर्शक कारभार आणि लोकप्रिय योजना 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 22Nov 18.30Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागांच्या उमेदवारांच्या उपस्थितीत ‘जनतेचा विश्वासनामा’ कलश कार्यालय येथे जाहीर करण्यात आला.माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात संधान आणि युवानेते विवेक कोल्हे यांनी स्वप्नातलं कोपरगाव अभ्यासपूर्ण सादरीकरणातून मांडत जनतेचे लक्ष वेधून घेतले.

या विश्वासनाम्यात पारदर्शक प्रशासन, दळणवळण व्यवस्था, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य-स्वच्छता, डिजिटल सुविधा, महिला-सुरक्षा, युवक-शिक्षण, संस्कृती आणि पायाभूत सुविधा अशा सर्व विभागांना न्याय देणारी व्हिजन मांडण्यात आली आहे.

नगरपालिका आपल्या दारीप्रभागवारीलाडकी बहिण मदत कक्षरोड-स्विपर मशीनसिग्नल व्यवस्थापार्किंग सोयमहिलांसाठी स्वच्छतागृहरोजगार आणि आरोग्य सुविधा, तसेच लोकप्रिय ‘जेवढे पाणी तेवढे बिल’ ही योजना नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली.

गोदावरी तीराचे सुशोभीकरण, नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टीत २० टक्के सवलत,तर शहरातील ज्या महिलांच्या नावावर घर असेल त्यांना घरपट्टीत ५० टक्के सवलत देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.“जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू… घोषणापत्र नव्हे, हा कोपरगावचा विकासनामा आहे,” अशी ठाम भूमिका पराग संधान यांनी मांडली.

नागरिकांनी दिलेल्या मागण्या, सूचना आणि अपेक्षा विचारात घेऊन तयार झालेल्या या विश्वासनाम्यामुळे शहरात उत्साहाचे आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page