कोपरगावमध्ये आज फडणवीसांची ‘तोफ’ धडाडणार
Fadnavis’ ‘cannon’ will be fired in Kopargaon today
आजची सभा म्हणजे – विकासाचा रोडमॅप की राजकीय ‘टर्निंग पॉइंट’?… उत्तर काही तासांत!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 23Nov 18.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :नगरपरिषद निवडणुकीच्या रणांगणात भाजप-आरपीआय-लोकसेवा आघाडीने अखेर जड तोफ मैदानात उतरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी सायं. ४.३० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात होणार असून, हीच सभा कोपरगावच्या निकालाची दिशा बदलू शकते, अशी राजकीय चर्चांना जोरदार उधाण आले आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान तसेच सर्व प्रभागातील उमेदवारांनी कोपरगावकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करताच, शहरात प्रचाराचा तापमान अचानक वाढले आहे.
कोपरगावच्या रस्ते-पाणीपुरवठा-रोजगार-पायाभूत सुविधा या जळजळीत प्रश्नांची उकल करण्यासाठी राज्य सरकारचे थेट पाठबळ आवश्यक असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी फडणवीस काय स्पष्ट भूमिका मांडतील? कोणत्या प्रलंबित कामांना हिरवा कंदील मिळणार? कोणत्या पायाभूत सुविधांना गती मिळणार? याकडे शहराचे डोळे खिळले आहेत.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नियोजनातून शहर विकासाचा व्यापक रोडमॅप तयार झाला असून, तो प्रत्यक्षात राबवण्यासाठी ही सभा “निर्णायक” ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगावच्या राजकारणात सध्या हालचालींचा वेग वाढलेला असतानाच, मुख्यमंत्री कोणती ‘कठोर’ भूमिका घेतील आणि कोणता मोठा संदेश देतील, याकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत.
नगरपरिषद निवडणुकीचा ‘गेमचेंजर’ ठरणारी सभा आज – शहराचे भविष्य ठरवणारे संदेश कोणते?
Post Views:
29