कोपरगावच्या विकासासाठी नगराध्यक्षपदी काका कोयटेच-आ. आशुतोष काळे

कोपरगावच्या विकासासाठी नगराध्यक्षपदी काका कोयटेच-आ. आशुतोष काळे

Kaka Koytech-A. Ashutosh Kale as the Mayor for the development of Kopargaon

“विकास थांबू देणार नाही… २ तारखेला राष्ट्रवादीलाच मोठं मताधिक्य द्या!”

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 2‌3Nov 18.20Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगावचा वेग, कोपरगावची ओळख आणि कोपरगावचा पुढचा पाच वर्षांचा प्रवास  यासाठी ‘एकच संकल्प’ हवा, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम ठेवणे, असा थेट आणि रोखठोक संदेश आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी कॉर्नर सभेत दिला.

“कोपरगावच्या नागरिकांना आता घोषणा करणारे नकोत,काम करणारे हवेत. आणि काम केलंय ते आम्हीच,” असे आमदार काळे यांचे शब्द उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी दाद देत स्वीकारले.

आ . आ आशुतोष काळे म्हणाले की,   लोकांना केवळ घोषणा नकोत, परिणाम हवेत. गेल्या पाच वर्षांत जे काम केले आहे ते कोपरगावकरांनी स्वतः अनुभवले आहे. महायुतीचे सरकार असून पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प राबविण्याचे आमचे नियोजन आहे,” असे त्यांनी सांगितले.

सभेत आमदार काळे यांनी मागील पाच वर्षांतील केलेल्या कामांचा धडाकेबाज आढावा घेतला. पाणीपुरवठ्याचे जाळे, रस्ते-विस्तार, एलईडी प्रकाशयोजना, क्रीडा-सांस्कृतिक प्रकल्प, शैक्षणिक-आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता अशा प्रत्येक क्षेत्रातील विविध कामांची त्यांनी ठळक उदाहरणांसह मांडणी केली. “काम करताना बोलत बसत नाही, कामातून दिसणारा विकास हा आमचा स्वभाव आहे,  कोपरगावचा विकास अडथळ्यांना न जुमानता पुढे न्यायचा आहे; बोलण्यापेक्षा काम करण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.

येत्या काळात कोपरगावला ‘आधुनिक, स्वच्छ, सुविधा-समृद्ध शहर’ म्हणून उभे करण्यासाठी विस्तृत विकास रोडमॅपही त्यांनी जाहीर केला. “महायुती सरकार आहे, अजितदादा पवार आपल्या पाठीशी उभे आहेत; त्यामुळे आणखी मोठ्या वेगाने कामे करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेत काका कोयटे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा देत आमदार काळे म्हणाले,
“कोपरगावचा विकास सुरू ठेवायचा असेल, तर नगराध्यक्षपदी काका कोयटे आणि सर्व राष्ट्रवादी नगरसेवकच निवडून आले पाहिजेत. ही निवडणूक कोपरगावच्या भवितव्याची आहे!”
विकास हवा असेल… तर राष्ट्रवादीच हवी
नागरिकांना त्यांनी स्पष्ट, थेट आणि संसदीय आवाहन केले,तारखेला मतदानाचा हक्क बजावा. राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा. विकास थांबू देऊ नका; कोपरगाव पुढे नेण्यासाठी तुमचा पाठिंबा अत्यावश्यक आहे!”

Leave a Reply

You cannot copy content of this page