राम मंदिर भूमिपूजनाच्या आनंदात रस्त्यावर फटाके फोडले; सात जणांवर गुन्हा दाखल

राम मंदिर भूमिपूजनाच्या आनंदात रस्त्यावर फटाके फोडले; सात जणांवर गुन्हा दाखल

वृत्तवेध ऑनलाईन 6 Aug 2020
By: Rajendra Salkar, 9:30

कोपरगाव : अयोध्या राम मंदिर भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये साडेबारा वाजेच्या सुमारास संपन्न झाले या जल्लोषात कोपरगाव येथे रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या सात भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश पदाधिकारी पार्टीच्या कार्यकर्त्यावर कोपरगाव शहर पोलिसात जमावबंदी व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन आटोपल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरील जयमल्हार कॉम्पलेक्स समोर विघ्नेश्वर चौक, येथे १२:४५ वाजेच्या सुमारास फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करताना आढळून आले. याप्रकरणी सत्येन सुभाष मुंदडा, रविंद्र रामदास बोरावके, सुशांत सुभाष खैरे, सोमनाथ जगन्नाथ आहिरे, कुणाल संतोष पवार सौ.प्राजक्ता प्रशांत खैरे, सौ.अमृता श्रीकांत खैरे, या सात जणांवर बेकायदेशिर जमाव जमवुन मा.जिल्हाधिकारी साो.,यांचे आदेशाची अवज्ञा करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशी घातक कृती केली तसेच कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहचु शकतो इतक्या बेदरकारपणे किंवा हयगईने सार्वजनिक रस्त्यावर फटाके वाजविले व मा. जिल्हादंडाधिकारी यांचे कारोना विषाणु संदर्भातील आदेशाचे उल्लंघन केले याबाबत पोकॉ. २६११ रामकृष्ण गोरख खारतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बीएस कोरेगावकर हे तपास करीत आहे दरम्यान सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page