पितृतुल्य मुरलीधर बाबा शिंगोटे : वृत्तपत्रातील गुरुवर्य व ऋषितुल्य छत्र हरपले
बाबांच्या पुण्य आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
वृत्तवेध ऑनलाईन 6 Aug 2020
By: Rajendra Salkar, 14:30
कोपरगाव : अनेक सुशिक्षित बेरोजगारांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून पत्रकार बनवून आर्थिक संपन्न केले, असे पितृतुल्य छत्र दैनिक पुण्यनगरी वृत्त समूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे आज आपल्यातून हरपले, असल्याच्या भावना पत्रकार राजेंद्र सालकर यांनी व्यक्त केल्या, वृत्तपत्र समूहातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व व आमचे गुरुवर्य बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली !
दोन दशकांच्या सहवासात कायम येता-जाता आपुलकीने चौकशी करणारे पुण्यनगरी समुहातील प्रत्येकावर कुटुंबातील ज्येष्ठाच्या मायने आधार देणारे व मायेची पाखर घालणारे एक सरळ साधे परंतु आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची क्षणोक्षणी जाणीव देणारे गुरुवर्य बाबा आज पडद्याच्या आड गेले आहेत. परंतु त्यांचे पश्चातही त्यांनी केलेले संस्कार, मार्गदर्शन आम्हाला आयुष्यात कायम आधार व बळ देत राहिल. शिंगोटे परिवार, संपूर्ण दैनिक पुण्यनगरी परिवारावर आज शोककळा पसरली आहे. या दुःखातून सावरण्याची परमेश्वर सर्वांना शक्ती देवो, बाबांच्या पुण्य आत्म्यास देव सद्गती देवो !
याच राजेंद्र सालकर परिवार, रिक्षा पतसंस्था, रिक्षा संघटना, कोपरगाव तालुका प्रेस क्लब सर्व सदस्य यांची अश्रुपूर्ण भाव श्रद्धांजली !
Post Views:
376