कोपरगांव शहर विकासात प्रत्येक महिलेचं निर्णायक मत-सौ. स्नेहलता कोल्हे 

कोपरगांव शहर विकासात प्रत्येक महिलेचं निर्णायक मत-सौ. स्नेहलता कोल्हे 

Every woman’s vote is decisive in the development of Kopargaon city-Mrs. Snehlata Kolhe

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 2‌6Nov 17.10Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगांव : कोपरगांव शहरात दिवसेंदिवस नवमतदाराबरोबरच आसपासची उपनगरे वाढत आहे त्यांच्या मुलभूत पायाभुत सुविधा पुरवितांना पालिका प्रशासनासमोर दुरदृष्टी असावी लागते आणि ती फक्त भारतीय जनता पक्ष, रिपाई, मित्रपक्ष व लोकसेवा आघाडीकडे आहे तेंव्हा पालिकेच्या होवु घातलेल्या निवडणुकीत भाजपा मित्रपक्षांना साथ द्यावी त्यासाठी प्रत्येक महिलेचं निर्णायक मत असणार असल्याची ग्वाही माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

           शहरातील प्रभाग क्रमांक पाच अ चे उमेदवार संतोष माधव शिंदे व ब च्या उमेदवार सौ वैशाली विजय वाजे, प्रभाग तीन मध्ये पल्लवी गुरमीत सिंग दडियाल, मयूर विजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शारदानगर व आढाव वस्ती भागात कॉर्नर सभा घेण्यांत आली त्यात सौ. कोल्हे बोलत होत्या.

          अपक्ष उमेदवार दिपक बबनराव वाजे यांनी शहर विकासासाठी पराग संधान यांनाच का निवडुन द्यायचे ही भूमिका याप्रसंगी समजावुन सांगितली.

          प्रारंभी माजी नगरसेवक विजय वाजे यांनी शहर विकासात आजवर केलेल्या कामाची माहिती देत माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी पालिका इमारत, सुसज्ज वाचनालय, अत्याधुनिक अग्निशमन केंद्र, शहर व ग्रामिण पोलिस ठाणे इमारत, पोलिस वसाहत इमारतींसह शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते, वीज, आरोग्य, गटारी आदिंसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी भांडुन निधी मिळवत जनविकासाची कामे मार्गी लावली.

          माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, दिलीप दारूणकर यांनी आपल्या भाषणातुन शहर विकासाचा आराखडा मांडला. उमेदवार सौ वैशाली वाजे व संतोष शिंदे यांनी क्रमांक पाच प्रभागासाठी आपणच योग्य का हे पटवुन दिले.

          नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, कोपरगांव शहर अहिल्यानगर जिल्हयाबरोबरच राज्यात सर्वांग सुंदर शहर करावयाचे आहे त्यासाठी प्रत्येकांने आपले मत आम्हांस देवुन सर्वच्या सर्व नगरसेवक आपल्या विचाराचे निवडुन देवुन बहुमत भाजपाला द्या तरच शहरवासी यांच्या सर्व नागरी समस्या सुटतील. आपल्या मुला-बाळाचं भविष्य घडविणांरी ही निवडणुक आहे. विरोधकांच्या भुलथापांना बळी पडु नका.

कोल्हे पुढे म्हणाल्या की, माजी नगराध्यक्ष स्व. बबनराव वाजे यांचेही शहर विकासात मोलाचे योगदान आहे. जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतांना शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी येसगांव शिवारात पिण्याच्या पाणी योजनेसाठी जागा घेवुन ठेवली म्हणून तेथे चार साठवण तळे होवु शकले व आता सुसज्ज पाचव्या साठवण तळयाची देखील निर्मीती करता आली. विकासाची दुरदृष्टी भाजपा-कोल्हे परिवाराकडे आहे. आधीची पाच वर्षे तुम्ही बघीतली त्यात फक्त आणि फक्त भ्रष्टाचार झाला आहे. येथील प्रभागात पावसाळयात साठणा-या पाण्याचा निचरा होत नसल्यांने त्याचा रहिवासीयांना मोठ्या प्रमाणांत त्रास होतो तो दुर करून अन्य सर्व विकासाची प्रलंबित कामे आम्ही मार्गी लावू पण त्यासाठी मतदारांनी २ डिसेंबरला आपले काम चोख करावे व भाजपा मित्रपक्षाच्या पारड्यात मते टाकावी. नगराध्यक्ष म्हणून पराग संधान यांना प्रचंड मताधिक्क्यांने निवडुन आणांवे.

          युवानेते विवेक कोल्हे व सर्व तीस नगरसेवकांसह नगराध्यक्षांचे विकासाचे व्हीजन पुर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर सभेत आपणांस दिला आहे, तेंव्हा मतदारांनी कोपरगांव पालिकेची सर्व सत्तासुत्रे भाजपा रिपाई मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या हाती द्या कोपरगांवला नंबरवन करून दाखवु असेही सौ कोल्हे शेवटी म्हणाल्या.

           याप्रसंगी औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर, माजी नगरसेविका ताराबाई वाजे, बाबुराव जपे, जालिंदर सोनवणे, शंकरराव उकिर्डे, भाजपा शहराध्यक्ष अनिता गाडे, निसारभाई सय्यद यांच्या सह क्रमांक पाच प्रभागातील सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संतोष शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page