कोपरगावचे पाणी स्वप्न माझ्याच हातून साकार! — आ. आशुतोष काळे
Kopargaon’s water dream comes true with my own hands! — A. Ashutosh Kale
विकास अडवणाऱ्यांना नाही, विकास करणाऱ्यांना निवडा; पाच वर्षांत कोपरगाव बदलून दाखवणार!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 26Nov 18.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“२०१९ च्या विधानसभा प्रचारात मी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण केला. आज शहराला चार दिवसाला पाणी मिळतंय… पण माझा उद्देश इथेच थांबणार नाही. कोपरगावला रोजचे पाणी देण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच!” अशा दमदार शब्दांत आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना चिमटे काढत प्रभाग क्र. ०८ मधील प्रचार सभेत घणाघात केला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाषण करताना त्यांनी विकास अडवणाऱ्या शक्तींवर टीकास्त्र सोडले. “शहराच्या प्रगतीला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीला पुन्हा संधी दिलीत तर कोपरगावचे भविष्य धोक्यात येईल,” असा इशाराच त्यांनी मतदारांना दिला.
काका कोयटे यांच्यासारखा अनुभवी, समाजकारणी व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेला उमेदवार दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ते कौतुक करतात. “कोयटे यांच्याकडे शहर बदलण्याचे व्हिजन आहे. राज्यभर फिरताना त्यांनी अनेक प्रगत शहरांचा अभ्यास केला आहे. त्या विकास-संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी लागणारा निधी मिळवणे ही जबाबदारी माझी,” असं ते म्हणाले.
पाणीसाठा वाढवण्यासाठी ३ आणि ४ क्रमांकाच्या तलावांचे काँक्रीट बांधकाम, ३० फूट खोलीकरण, पुढील ५० वर्षांचा जलप्रश्न सोडवणे, प्लॉट-इमारतींची झपाट्याने वाढ—या सर्व गोष्टींनी शहराचा चेहरामोहरा बदलल्याचेही त्यांनी सांगितले.
“कोपरगावकरांसाठी मला रोज पाणी देणारे शहर घडवायचं आहे. त्यासाठी सत्ता द्या, विकास देणारे हात पुढे करा,” असे थेट आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.
Post Views:
26





