कोपरगावचा विकास, खोट्या आश्वासनांवर नाही – फक्त विश्वासू नेतृत्वावर!

कोपरगावचा विकास, खोट्या आश्वासनांवर नाही – फक्त विश्वासू नेतृत्वावर!

Kopargaon’s development, not on false promises – only on trustworthy leadership!

आ. आशुतोष काळे आणि काका कोयटे यांचा नागरिकांसमवेत जोरदार संवाद –

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 2‌7Nov 18.20Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: कोपरगाव शहरात चाळीस वर्ष सत्ता असतांना विकासाचा पाठलाग न करता, नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड यातना भोगवणाऱ्या विरोधकांनी, आता निवडणुकीच्या तोंडावरच विकासाचे खोटे स्वप्न दाखवणे सुरू केले आहे.या खोट्या आश्वासनाला आणि भ्रमाला बळी पडू नका, असे नागरिकांना आवाहन करत आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.ते प्रभाग क्र. ०१ मध्ये झालेल्या कॉर्पोरेट सभेत बोलत होते.

“२०१९ पासून कोपरगाव शहरासाठी कोट्यावधी रुपये निधी दिला गेला आहे. येणाऱ्या काळातही शहराच्या सर्व विकासकामांची गंगा अविरतपणे वाहत राहण्यासाठी काम करणारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या. विरोधकांनी न्यायालयातून स्थगिती आणलेले २८ विकासकाम पुन्हा थांबवू नयेत,” असे ते म्हणाले.
त्यांनी विशेष करून नमूद केले की, ५ नं. तळ्याचे काम पूर्ण झाले आणि शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे, जे चाळीस वर्ष सत्ता असलेल्या विरोधकांकडून झाले नसते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे म्हणाले:

“विरोधकांचे फटाके फुस झाले. त्यांच्या सभेतच प्रमुख पाहुण्यांनी त्यांना सुनावले. आका, काका आणि दादा – आम्ही तिघेजण कोपरगावाचा सर्वांगीण विकास करणार आहोत. विकास हा आमचा एकच ध्यास, एकच ध्येय आहे. आ. आशुतोष काळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी शहराला विकासाच्या बाबतीत अव्वल करणार आहे.”

आ. आशुतोष काळे यांनी नागरिकांना सांगितले की, विरोधकांच्या हातात पुन्हा सत्ता देऊ नका, कारण त्यांच्या विकासविरोधी वृत्तीमुळे शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
“येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, हीच माझी अपील आहे,” असे त्यांनी समारोपात नागरिकांना सांगितले

Leave a Reply

You cannot copy content of this page