काळे कारखान्याकडून उसाला दिलासा; पहिली उचल तब्बल ३,००० रुपये प्र.टन – आ. आशुतोष काळे यांची घोषणा

काळे कारखान्याकडून उसाला दिलासा; पहिली उचल तब्बल ३,००० रुपये प्र.टन – आ. आशुतोष काळे यांची घोषणा

Relief for sugarcane from Kale factory; First harvest at Rs 3,000 per ton – Announcement by A. Ashutosh Kale

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 2‌7Nov 18.30Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ हंगामासाठी उसाला प्रती मे.टन एफआरपीपेक्षा जास्त ३,००० रुपयांची पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी दिली.

५ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या हंगामात आजअखेर १.१५ लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत पहिल्या उचलदराचा अंतिम निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकाच शेतकऱ्यांसाठी आधार ठरत असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

काळे कारखान्याकडून शेतकऱ्यांना दर वर्षी सर्वाधिक दर व वेळेत पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवली जात आहे. पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट २९ नोव्हेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून पुढेही दर पंधरा दिवसांनी नियमित पेमेंट केली जाणार आहे.

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने यंदाही समाधानकारक दर जाहीर केल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page