कोपरगाव नगरपरिषद निवडणूक : गरीबांच्या विकासासाठी सत्ता भाजपालाच द्या – बिपीन कोल्हे

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक : गरीबांच्या विकासासाठी सत्ता भाजपालाच द्या – बिपीन कोल्हे

Kopargaon Municipal Council Election: Give power to BJP for the development of the poor – Bipin Kolhe

विरोधकांना झोपडपट्ट्यांची ओळखही नाही… आम्ही ४५ वर्षांपासून काम करत आहोत”

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 2‌7Nov 18.10Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी झोपडपट्टीतील व वंचित घटकांच्या समस्या ओळखून त्यावर काम केले. त्याच परंपरेत गरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी पालिकेची सत्ता भाजप-आघाडीला द्या. यातून कोपरगावच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू होईल, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार जितेंद्र रणशूर, विजया देवकर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काकडे हे होते.

प्रारंभी उमेदवार रणशूर व देवकर यांनी प्रभागातील करण्यात आलेली कामे आणि भविष्यातील नाले, शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्ट्रीटलाईट, नळपाणी, आरोग्यविषयक योजना याची माहिती दिली.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान म्हणाले, कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिकाला सुविधांचा हक्क आहे. गरीब, वंचित, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि प्रगतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

बिपीन कोल्हे म्हणाले, कोपरगाव शहरावर संकट आले की संजीवनी सर्वात आधी धावत आली आहे. ४५ वर्षांपासून आम्ही लोकांसोबत उभे आहोत. झोपडपट्टीतील लोकांना चांगले घर मिळावे, विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे, शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले तर ५० टक्के जागा स्थानिकांना मिळावी, ही आमची भूमिका आहे.

विरोधकांच्या हाती सत्ता गेली तर शहरात दुजाभाव होईल. मतदारांची छोटीशी चूक पाच वर्षांचा त्रास ठरू शकते. त्यामुळे भाजप-आघाडीला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.शेवटी आभार जितेंद्र रणशूर यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page