आशुतोषची ‘लाडकी दादागिरी’ मी सहन करतो कारण तीकोपरगावसाठी आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

आशुतोषची ‘लाडकी दादागिरी’ मी सहन करतो कारण तीकोपरगावसाठी आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

I tolerate Ashutosh’s ‘darling’ bullying because it is for Tikopargaon – Deputy Chief Minister Ajit Pawar

काका म्हणजे अनुभवी चेहरा! शब्द दिला म्हणजे पूर्ण; हेच राष्ट्रवादीचं चिन्ह”

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 2‌8Nov 20.15Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : “कधी कधी आशुतोष काळे थोडी लाडकी दादागिरी करतो. मीच म्हणालो,आत्ता नाही भेटणार मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे मी ऐकणार नाही  असं पी ए ला ठणकावलं त्याने मला सांगितले  मी म्हणलं काहीतरी महत्त्वाचे आहे मी ताबडतोब फोन घेतला त्यांनी मला बिबट्याच्या हल्ल्याची कल्पना दिली  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले मी तातडीने जिल्हाधिकाऱ्याला फोन लावला.ती दादागिरी त्याच्या स्वार्थाची नाही. ती शहराच्या प्रेमातून, जबाबदारीतून आहे. म्हणूनच मी सहन केली, आदर दिला आणि पुढेही देणार ” उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानाने सभेतच टाळ्यांचा कडकडाट झाला.

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीत पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मा.आ.अशोकराव काळे होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुका सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार दिले आहेत. परंतु कोपरगाव शहराच्या विकासाला अधिकची चालना मिळावी यासाठी स्वत:कडे असलेले कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन पूर्ण  होवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आशुतोषने सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने नगराध्यक्षपदासाठी आतिशय चांगला उमेदवार दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे त्यांनी कौतुक केले. कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न आशुतोष नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करीत आला आहे. हक्काने माझ्याकडे कोपरगावच्या समस्या मांडतो आणि समस्या सोडवून घेतो. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारचे आणि विशेष माझे पाठबळ कायम त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे काका कोयटे यांना तरून, तडफदार व व्हिजनरी नेतृत्व असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांची साथ आणि मा.आ.अशोकराव काळे यांचे मार्गदर्शन असल्यामुळे कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला. कोपरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय करायचे,त्यानंतर एक वर्षात कोणती विकास कामे हाती घ्यायची व पाच वर्षांनंतर काय विकासकामे करायची याचे व्हिजन कोपरगावकरांपुढे ठेवले आहे अशा व्हिजन डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून उद्याचे आधुनिक, प्रगत, सक्षम कोपरगाव उभे करण्याचा ठोस संकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आशुतोषच्या मार्गदर्शनाखाली काका कोयटे कोपरगावचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतील अशी ग्वाही  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीतदादा पवार यांनी यावेळी दिली.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की,  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीतदादा पवार यांच्या सहकार्यातून पाणी पुरवठा योजना मंजूर होवून पाच नंबर साठवण तलाव पूर्ण होवून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागून २३ दिवसांनी मिळणारे पाणी आता तीन दिवसाआड मिळत आहे परंतु कोपरगाव शहराचा झपाट्याने वाढत असल्यामुळे कोपरगाव करांना दररोज पाणी द्यायचे असून ३ आणि ४ नंबरचा तलाव सिमेंट कॉक्रीटचा करायचा असून क्र.२ आणि क्र.३ साठवण तलावाच्या जागेवर सोलर पॉवर प्लांट उभारायचा आहे. कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी गरज पडल्यास ६ नं. तलावाला जमीन घेण्यासाठी निधीच गरज भासणार आहे. २८० कोटी निधीतून  भूमिगत  गटारीचे काम लवकरच सुरु होणार असले तरी कोपरगावा शहरातील वीज वाहिन्यांचे जाळे कमी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी  वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.तसेच शहरामध्ये पंचायत समिती क्वार्टर्स व पशु संवर्धनच्या या दोन ठिकाणी शासनाच्या जागा असून त्या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारणीची परवानगी द्यावी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर  गोदावरी नदीकाठ  सुशोभिकरण  करायचे आहे. एचएएम (HAMच्या) योजनेतून ६० किलोमीटरच्या रस्त्याची मागणी केली आहे या मागण्या आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री  ना.अजितदादा पवार यांच्याकडे मांडून या मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह धरला.

याप्रसंगी वेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या मा. संचालिका सौ. चैतालीताई काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, कोपरगाव एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, महानंदाचे मा.चेअरमन राजेंद्र जाधव, कारभारी आगवन, नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे,  काकासाहेब जावळे, संभाजी काळे, बाबासाहेब कोते, धरमचंद बागरेचा, बाळासाहेब आढाव, डॉ.अजय गर्जे, सतीश कृष्णानी, माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारूदत सिनगर, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, वीरेन बोरावके, दिनार कुदळे, फकीरमामू कुरेशी, संदीप कोयटे, सौ.स्वाती कोयटे,  सेवासिंग सहानी, प्रकाश दुशिंग, शिवाजी ठाकरे आदींसह नगरसेवक पदाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page