कोपरगावला ‘विकास’ हवा तर सत्ता राष्ट्रवादीच्याच हाती द्या! – आ. आशुतोष काळे
If Kopargaon wants ‘development’, then hand it over to the NCP! – MLA Ashutosh Kale
महायुती सरकारचे पाठबळ, निधी, मोठ्या प्रकल्पांची हमी; २ तारखेला राष्ट्रवादीला मतदान करा – जोरदार आवाहन
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 29Nov 20.15Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगावचे भविष्य बदलण्याची सुवर्णसंधी आता तुमच्या एका मतात आहे. शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता या सर्व ज्वलंत प्रश्नांसाठी राज्यातील महायुती सरकारकडून निधी मिळणार आहे. कोपरगाव विकसित शहरांच्या यादीत वर न्यायचे असेल तर कोपरगाव नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे देणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ०६ मध्ये आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
“विरोधकांनी फक्त घोषणा केल्या… काम काहीच नाही!” – काळे
आ. काळे म्हणाले की,“कोपरगावच्या नागरिकांना घोषणा नकोत, काम हवे आहे. विरोधकांच्या घोषणांनी कोपरगाव मागे पडले. पण २०१९ नंतर आम्ही पाणी प्रश्न कायमचा सोडवला, रस्त्यांचा विकास केला, व्यापारी संकुल, भूमिगत गटारी, शहर सुशोभीकरण यामुळे कोपरगाव बदलायला सुरुवात झाली आहे.”
तरीही शेजारची शहरे विकासात पुढे गेली असल्याचे ते म्हणाले. नियोजनबद्ध विकास, बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा, गजबजलेली बाजारपेठ तयार करायला राष्ट्रवादीचे प्रशासन गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“निधी आणण्याची जबाबदारी माझी… विकास करण्याची जबाबदारी तुमची!”
आ. काळे पुढे म्हणाले,“अजितदादा पवार निधीसाठी सदैव तत्पर आहेत. परंतु हा निधी योग्य वापरून जास्तीत जास्त विकासकामे करायची असतील तर कोपरगाव नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे देणे भाग आहे.”
कोपरगावच्या विकासाचे काम जितके जातीने मांडू तितके महायुती सरकार त्यावर निर्णय घेते आणि निधी देते, असेही त्यांनी सांगितले.
“२ तारखेला मतदानरूपी आशीर्वाद द्या – कोयटे यांना विजयी करा!”
आ. काळे म्हणाले,“कोपरगाव विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्यासाठी काका कोयटे यांच्यावर विश्वास ठेवा. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”
Post Views:
31





