निवडणुकीचा ‘गेम’ रद्द… आणि पुन्हा सुरू!

निवडणुकीचा ‘गेम’ रद्द… आणि पुन्हा सुरू!

The election ‘game’ is canceled… and starts again!

तीन डिसेंबरला संपणारी लढत थेट २१ डिसेंबरवर! त्याच तिकिटावर, तोच खेळ पुन्हा! आयोगाच्या एका निर्णयाने उमेदवारांचा सगळा खेळच बोंबलात!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 3Dec 10.00Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :निवडणूक आयोगाने एका फटक्यात दौड थांबवली.ज्या निवडणुकीचा अखेर तीन डिसेंबर रोजी पडदा पडणार होता, ती थेट २१ डिसेंबरपर्यंत लांबवली.

आणि ४ डिसेंबरपासून पुन्हा त्याच तिकिटावर, त्याच खेळाडूंसोबत, तोच खेळ पुन्हा सुरू आता एवढ्या मोठ्या आढ्यतेने लोकशाहीच्या मैदानात शिटी वाजवली जणू “ओ खेळाडूंनो, परत एकदा तयारी करा! खर्च दुप्पट, ताण तिप्पट, आणि निकाल? बघू पुढे!”

नाश्त्यापासून जेवणावळीसाठी कुपन्स! निवडणूक की फूड फेस्टिव्हल?

मतदान दोन तारखेला असताना शहरात वेगवेगळी कुपन्स, हॉटेलं, चहापोहे, बिर्याणीचे पाकिटं खातील की निवडतील? असा प्रश्न होता! एकाच हॉटेलवर गर्दी नाही, एकाच माणसाचे पोट बिघडले नाही,एकाच प्रचारमंडळाला मोकळेपणा नाही जिथे पहा तिथेच आर्थिक विकास,निवडणुकीची लाट तर होतीच,पण पैशाची सुद्धा होती.आणि जेंव्हा ‘धंदा’ जमायला लागला,तिकडेच आयोगाची शिट्टी  निवडणूक स्थगितक्षणात पार्टीतला सारा रंग उडाला.

 शहरात स्मशान शांतता… कट्ट्यांवर एकच चर्चा! कोपरगावात चहाच्या टपरीवर, कट्ट्यांवर, चौकांत एकच मुद्दा ,काय झालं? कसं झालं? आणि आता पुन्हा एवढा खेळ का?

ज्यांच्याकडे पक्ष आहे त्यांचा निभाव लागत राहील,पण धोबीपछाड बसली ती अपक्षांना!ज्यांनी पैसा ओतून,पायपीट करून, जनसंपर्काचा पाया घातला, त्यांच्या खिशाला आणि मनाला दोन्ही ठिकाणी धक्का   काहींनी तर थेट हात टेकले, “आणखी २१ दिवस खेळाय, निराश 

अपक्षांची मोडतोड! तग धरले तेच सर्वात जास्त पोळले!

माघारीच्या घोडेबाजारात लोकशाहीच्या रणांगणात ज्यांनी लोभाला बळी न पडता, ज्यांनी घराघराच्या दारावर मतदान मागितलं, त्यांना या निर्णयाने सर्वाधिक फटका.तिकिटं, प्रचार, पैसा, संपर्क यांचं गणित कोलमडलं. निवडणुकीचा हा कार्यक्रम बदलायचा का? बदलला तर एवढं का? जनतेपेक्षा जास्त तर उमेदवारच चक्रावले.

चार डिसेंबरपासून पुन्हा त्याच तिकिटावर खेळ पुन्हा!

आता पुन्हा तेच चेहरे, तेच पोस्टर्स,तेच घोषवाक्यं, तीच बॅनर्स.म्हणजे काय तर निवडणूक संपली नाही, फक्त कार्यक्रम आणखी वाढवला!’

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य, अयोग्य हा मुद्दा वेगळा.पण एक गोष्ट मात्र नक्की या रणसंग्रामात सर्वात मोठा पराभव मतांचा नाही, उमेदवारांच्या मनाचा आणि त्यांच्या खिशाचा झालाय.!

Leave a Reply

You cannot copy content of this page