“संविधानाच्या मूल्यांवर चालणं हीच खरी आदरांजली” — आ. आशुतोष काळे

संविधानाच्या मूल्यांवर चालणं हीच खरी आदरांजली” — आ. आशुतोष काळे

“Following the values ​​of the Constitution is the true tribute” — MLA Ashutosh Kale

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारपर्वाला उजाळा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 6Dec 19.20Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” या महामंत्राने समाजाला नवदिशा देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार,विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव शहरातील स्मारकास आ. आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलतांना आ. काळे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी दाखवलेला शिक्षणाचा, स्वाभिमानाचा व सामाजिक न्यायाचा मार्ग आजही काळानुरूप तेजस्वी आहे. त्यांनी मांडलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मुल्ये देशाच्या हृदयात कोरलेली आहेत.

आ. काळे पुढे म्हणाले, “संविधान हे फक्त कायद्यांचे पुस्तक नसून मानवमूल्यांचे पवित्र दस्तऐवज आहे. समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणणे हेच बाबासाहेबांच्या कार्याचे खरे सार आहे. आपण त्यांच्या आदर्शांवर चाललो तर तीच त्यांच्यावरील सर्वोच्च आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाला भन्ते कश्यापजी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page