महामानव आंबेडकरांमुळेच लोकशाहीचे अधिकार – स्नेहलता कोल्हे

महामानव आंबेडकरांमुळेच लोकशाहीचे अधिकार – स्नेहलता कोल्हे

Democratic rights are due to the great man Ambedkar – Snehlata Kolhe

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 6Dec 19.30Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाचे महासूर्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोपरगावात अभिवादन करण्यात आले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी स्मारकाला भेट देत बाबा साहेबांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

या वेळी बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,“महामानव डॉ. आंबेडकर देहाने नसले तरी त्यांचे विचार, त्याग आणि कीर्ती पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.”

सामाजिक ऐक्य, बंधुता आणि न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी दिलेली विचारसंपदा आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची चौकट भारताच्या विकासप्रवासाला आधार देणारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

“समानता, शिक्षण, मानवता आणि प्रगती या मूल्यांवर काम करणे हीच त्यांना खरी आदरांजली,” असेही मत व्यक्त झाले.

या कार्यक्रमाला भाजपा–आरपीआय, मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम स्थळी विचारस्पंदन, एकात्मता आणि भावपूर्ण वातावरण अनुभवास आले.
डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा वारसा जपण्याचा आणि समाजाला योग्य दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page