आ. आशुतोष काळेंच्या हस्ते मशाल प्रज्वलन; कर्मवीर शंकरराव काळेंचे स्वप्न प्रत्यक्षात
A. Ashutosh Kale lights the torch; Karmaveer Shankarrao Kale’s dream comes true
गौतम पब्लिक स्कूलमध्ये राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला शानदार सुरुवात
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 6Dec 19.40Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :गौतम पब्लिक स्कूलमध्ये राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. मशाल प्रज्वलन आणि विशेष तयार केलेली हॉकी स्टिक फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडत स्पर्धेची रंगतदार सुरुवात झाली.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत आणि कला या सर्व क्षेत्रांवर समतोल भर दिला जातो. विस्तीर्ण मैदानं, अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित क्रीडा शिक्षक यामुळे या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्याचे कर्मवीर शंकरराव काळे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
ते म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत हा आमचा ध्यास आहे. त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ.”
या स्पर्धेत नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि अमरावती विभागातील १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत गौतम पब्लिक स्कूलने डॉन बॉस्को संघाचा ३-० असा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने नाशिकचा पराभव केला. अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल (पुणे विभाग) व डी.सी. नरके विद्यालय, कुडीत्रे (कोल्हापूर विभाग) यांच्यात होणार आहे.
खेळाडूंच्या निवास, भोजन, मैदानी सुविधा आणि संपूर्ण व्यवस्थेची उत्तम सोय संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
Post Views:
83





