कर्मवीर काळे साखर कारखान्याकडून ऊसतोडणी कामगारांसाठी ‘उन्नती शिबीर’

कर्मवीर काळे साखर कारखान्याकडून ऊसतोडणी कामगारांसाठी ‘उन्नती शिबीर’

Karmaveer Kale Sugar Factory organizes ‘Upgradation Camp’ for sugarcane harvesting workers

मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरणाचा उपक्रम

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 6Dec 19.50Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गाळप हंगाम २०२५-२६ साठी आलेल्या सर्व ऊसतोडणी कामगारांसाठी ‘उन्नती शिबीर’ अंतर्गत मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे व मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक मा.आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी संचालक एस.एस. बोरनारे यांनी दिली.

शुक्रवार (दि.०५) रोजी ऊसतोडणी कामगारांच्या वसाहतीत हे शिबिर पार पडले. उद्घाटन कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, लहान मुलांचे आरोग्य परीक्षण अशा विविध चिकित्सा करण्यात आल्या.

कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे म्हणाले,“ऊसतोड कामगार हे कारखान्याच्या गाळप व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. कष्टप्रद कामामुळे ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात गंभीर आजारांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी दरवर्षी उन्नती शिबिरांतर्गत मोफत तपासणी व औषधोपचार दिले जातात.”

तपासणीत निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार केला जाणार असून कामगारांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या शिबिराला प्रवीण शिंदे (व्हा. चेअरमन), सोमनाथ बोरनारे (कार्यकारी संचालक), सुनील कोल्हे (जनरल मॅनेजर), बाबा सय्यद (सेक्रेटरी), संदीप शिरसाठ (असी. सेक्रेटरी), निळकंठ शिंदे (शेतकी अधिकारी), तसेच डॉ. संदीप हरतवाल, डॉ. शैलेन्द्रकुमार जैन, डॉ. सागर रहाणे, डॉ. गणेश गावडे, डॉ. सोनाली मुरादे आदी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

उन्नती शिबिरामुळे ऊसतोडणी कामगारांना आरोग्य सुरक्षा मिळून गाळप हंगाम अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page