कोपरगावात अवैध धंद्यांची वाढ;आ. आशुतोष काळेंकडून मुख्यमंत्र्यांना थेट निवेदन

कोपरगावात अवैध धंद्यांची वाढ;आ. आशुतोष काळेंकडून मुख्यमंत्र्यांना थेट निवेदन

Increase in illegal businesses in Kopargaon; Direct statement from MLA Ashutosh Kale to the Chief Minister

कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 8Dec 20.50Pm.By  सालकर राजेंद्र 

 कोपरगाव :कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघात वाढत्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना पोलीस प्रशासनाकडून उघड डोळेझाक होत असल्याचा गंभीर आरोप करत आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. नागपूर येथील हिवाळीअधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली.

कोपरगावात विविध प्रकारचे अवैध व्यवहार दिवसाढवळ्या सुरू असून, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असल्याचे काळेंनी निवेदनात नमूद केले आहे. नागरिक भयभीत आहेत, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याची तक्रार त्यांनी केली.

यापूर्वी (दि. ०३) काळेंनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर आज पुन्हा नागपूर येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत पोलीस प्रशासन अवैध व्यवसायाला पाठबळ देत असल्याचे त्यांनी स्पष्ट नमूद केले.
कारवाई होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

अवैध धंदे थांबले नाहीत तर मीच रस्त्यावर!” — आ. आशुतोष काळे

चौकट  “कोपरगावातील अवैध धंद्यांना थेट पोलीस प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याने हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन देण्यात आले आहे. कारवाईची खात्री त्यांनी दिली आहे. मात्र जर अवैध धंदे तातडीने बंद झाले नाहीत, तर मी स्वतः रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार.” — आ. आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page