महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात संजीवनी’ च्या सिद्धी तांबे ची शानदार एन्ट्री !

महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात संजीवनी’ च्या सिद्धी तांबे ची शानदार एन्ट्री !

Sanjeevani’s Siddhi Tambe’s brilliant entry into the Maharashtra softball team!

१६० खेळाडूंमधून दमदार झेप थेट राज्य सॉफ्टबॉल संघात !

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 9Dec 10.30Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शिर्डीतील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची तडफदार खेळाडू सिध्दी महेंद्र तांबे हिने १७ वर्षे वयोगटातील महाराष्ट्र सॉफ्टबॉल मुलींच्या राज्य संघात थेट एंट्री घेतली. नागपूर येथे झालेल्या निवड प्रक्रियेत राज्यभरातील तब्बल १६० खेळाडूंना मागे टाकत सिध्दीने दमदार झेप घेत थेट अव्वल १६ जणींमध्ये स्थान मिळवले.

संजीवनीच्या मुलींच्या संघाने जिल्हा–विभागीय पातळीवर गाजवलेल्या खेळाच्या जोरावर राज्यस्तरात प्रवेश मिळवला होता. त्यात सिध्दीने दाखवलेल्या कलेने राज्य निवड समितीचे लक्ष वेधले. आता छत्तिसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, संजीवनीच्या दृष्टीने हा मोठा मानाचा क्षण ठरला आहे.

यशाबद्दल संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सिध्दी आणि वडील महेंद्र तांबे व आई पुर्णिमा तांबे यांचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी सिध्दीचा सत्कार करून तिचे मनोबल वाढवले. यावेळी प्राचार्या रीना राजपूत आणि प्रशिक्षक विरूपक्ष रेड्डी उपस्थित होते.

चौकट 

 सिध्दीची ‘सिक्सर’ परफॉर्मन्स!

सिध्दी तांबेची निवड ही तिच्या मेहनतीची पावती आहे. राष्ट्रीय स्तरावर ती महाराष्ट्रासाठी चमकदार कामगिरी करेल, असा पूर्ण विश्वास आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक–विद्यार्थी–शिक्षक यांचा समन्वय हीच संजीवनीची ताकद आहे.”डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स

Leave a Reply

You cannot copy content of this page