काका कोयटे मैदानात येताच विरोधक ‘ बिथरलेत’-आ.आशुतोष काळे

काका कोयटे मैदानात येताच विरोधक ‘ बिथरलेत’-आ.आशुतोष काळे

As soon as Kaka Koyate entered the field, the opponents were ‘rattled’ – MLA Ashutosh Kale

चौकशीच्या नावाखाली राजकीय सूड?—आ. आशुतोष काळे

समता पॅटर्नची एलर्जी;” — काका कोयटे

“३० प्लसचा गेम फिक्स; विरोधकांचे डाव बूमरँग!” — संदीप कोयटे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 11Dec 20.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: समता आणि काका कोयटे हे सहकार–शैक्षणिक–सामाजिक क्षेत्रात निष्ठेने काम करणारे व्यक्तिमत्त्व. लोकांचा विश्वास आणि स्वच्छ प्रतिमेमुळे आम्ही त्यांना नगराध्यक्ष पदासाठी विनंती केली. ते स्वतः राजकारणापासून दूर होते; पण कोपरगावच्या विकासासाठी त्यांना पुढे यावंच लागलं.”ते आल्याने  निवडणुकीचा संपूर्ण माहोल बदलला.पराभव समोर दिसू लागल्याने  विरोधकांची भाषा, पातळी आणि पद्धत बदलली. विरोधक माझ्यावरून काकांकडे घसरू लागले. असल्याचा घणाघाती आरोप करत आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.

गुरुवारी (११) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समता पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. आशुतोष काळे बोलत होते यावेळी नगराध्यक्ष पदाची उमेदवार काका कोयटे समताचे संचालक संदीप कोयटे, अरविंद पटेल,  शहराध्यक्ष सुनील गंगुले आदी उपस्थित होते.

 विरोधकांवर थेट निशाणा साधतांना ते म्हणाले की, काका लोकप्रिय होताच नेहमी खोडा घालणाऱ्या विरोधकांनी समताच्या चौकशीचा हत्यार काढलं  अशा खोडसाळ आरोपांनी काहीही बिघडणार नाही.” असा टोला देखील आ. काळेंनी लगावला.

 “पाच नंबर तलाव असो किंवा २८ विकासकामं, विरोधकांचं एकच काम  अडथळे, काल-परवा निवडणुकीतही खोडा घातला. जनतेत न जाता ते चौकशींची भाषा बोलतात. काय चौकशी? काय व्हायचं ते होऊ द्या! समताचा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आहे या चौकशीतून काहीच होणार नाही. आमचे तीन पक्षांचे सरकार राज्यात आहे त्यामुळे मला येथे फार बोलता येणार नाही असे ते म्हणाले यामुळे याउलट  आमचे मताधिक्यच वाढणार आहे.”“त्यामुळे आता कोणी त्यांना गांभीर्याने घेत नाही.” असा मिश्किल टिका देखील आ. काळे यांनी  केली.

“ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. आम्ही बिंदासपणे उमेदवारी दिली. काकांच्या मागे मी आणि अजितदादा ठामपणे उभे आहोत. चांगला उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. म्हणूनच ते बिथरल्याने विकासाच्या मुद्द्यांना बाजूला सारून ते फक्त टीका करीत सुटले आहेत,” असा घणाघात करत आ. काळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

थकबाकीदारांना पुढे करून तक्रारी! पण उलट ठेवी वाढल्या!” — संदीप कोयटे

समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले,काका कोयटे लोकप्रिय होताच काही राजकीय महाशक्ती जागल्या. सकाळी अर्ज–संध्याकाळी चौकशी हा समतासाठी खास नियम केला असल्याचा खेद व्यक्त करतांना तीन महिनेपूर्वी तपासणी झाली आणि अहवाल स्वच्छ होता. मग अचानक चौकशी लावली? अधिकारी दबावाखाली असल्याचे कबूल करतात ,जनतेला सगळं ठाऊक आहे, पब्लिक है सब जानती है!”

ते पुढे म्हणाले,“ठेवीदारांना फोन करून पैसे काढायला सांगितलं. पण उलट १ कोटी ८६ लाख रुपये नवीन ठेवी वाढल्या! याहून मोठा जनाधाराचा पुरावा कोणता?”

“थकबाकीदारांच्या नावाने बनावट पत्रके, सोशल मीडियावर अपप्रचार  याबाबत आम्ही पोलिसात तक्रार देखील केली आहे विरोधकांना सगळं काही करू देत पण आता हा डाव  विरोधकांवरच बूमरँग होणार असल्याचे ठणकावले ”

समता पॅटर्न लोकप्रिय झाला की काहींना ऍलर्जी होते— काका कोयटे

काका कोयटे यांची टीका अधिक धारदार—
“समता पॅटर्न लोकप्रिय झाला तर कुणाला तरी एलर्जी होते! म्हणून समताला टार्गेट केले जात आहे. परदयामागे कोण बसलं आहे… जनता सगळं पाहतेय.”

काका कोयटे म्हणाले की,“स्व. शंकरराव काळे आणि स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाळलेले नियम आम्ही आजही पाळतो. आम्ही कधीही इतर संस्थांवर चिखलफेक केली नाही. पण जर इतकीच एलर्जी असेल… तर येऊन आमच्याविरुद्ध निवडणूक लढवा असे आव्हान विरोधकांवर निशाणा साधताना पत्रकार परिषदेतून केले!”

कोपरगावच्या राजकारणात दिवसेंदिवस चुरस वाढत असतानाच आ. काळेंची ही बोचरी प्रतिक्रिया,व  कोयते पितापुत्राचा घणाघात या राजकीय चर्चांना आणखी उधाण आणणारी ठरत आहे.

चौकट 

“ठेवीदार, जनता, नेतृत्व आमच्यासोबत आहे. पराभव दिसू लागला की लगेच विरोधकांची पातळी घसरते. पण या निवडणुकीत आम्ही स्पष्ट बहुमताने जिंकणारच पण ३० प्लस उमेदवारांच्या मताधिक्याचा  अहिल्यानगर जिल्ह्यात इतिहास घडवणार” संदीप कोयटे

Leave a Reply

You cannot copy content of this page