रयत शिक्षण संस्थेचा ‘दंत आरोग्य सेमिनार’ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये!
Rayat Shikshan Sanstha’s ‘Dental Health Seminar’ enters the World Records!
शरद पवारांच्या वाढदिवस निमित्त ऑनलाइन उपक्रमातून विद्यार्थ्यांना दंतस्वच्छतेचे मार्गदर्शन
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir 12Dec 9.10Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव,: ग्रामीण भागात आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने यंदा मोठी झेप घेत ‘दंत आरोग्य व स्वच्छता’ या विषयावरील ऑनलाइन सेमिनारची विश्वविक्रमी नोंद केली. अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा मोठा सहभाग दिसून आला.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले की, “पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे संगणक शिक्षण, AI आधारित अध्यापन, इंटरनेटयुक्त वर्गखोल्या यांसारखे असंख्य उपक्रम संस्थेत यशस्वीरित्या राबवले जात आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देणे ही रयतची सातत्याने जपलेली परंपरा आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख म्हणाले, “दंत स्वच्छता हा अनेकदा दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा विषय. विद्यार्थ्यांत जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम मोठी गरज होती. पुढील वर्षी ‘डोळ्यांची निगा’ या विषयावरही सेमिनार घ्यावा.”
महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आणि रयत संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी संस्थेच्या उपक्रमांची परंपरा सांगताना, “१२ डिसेंबरला पवार साहेबांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा केला जातो,” असे नमूद केले.
सेमिनारचे प्रमुख वक्ते डॉ. अंकित कृष्णानी यांनी दंतस्वास्थ्याचे महत्त्व सोप्या, मनोरंजक आणि दाखल उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावले. चुकीच्या सवयींमुळे होणारे दंत आजार, पचनक्रिया, दुर्गंधीची कारणे, जिभेवरील थर आणि टंग-क्लिनरच्या वापराचे महत्त्व यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी प्रास्ताविकातून सेमिनारचे उद्दिष्ट स्पष्ट करत पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आभार डॉ. निलेश मालपुरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. सीमा दाभाडे यांनी केले.
या वर्ल्ड रेकॉर्ड सेमिनारला रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
63