राघवेश्वर महादेव मंदिर विकासाला गती; महायुती सरकारकडून दीड कोटींचा निधी – आ. आशुतोष काळे
Raghavshwar Mahadev temple development gains momentum; Rs 1.5 crore fund sanctioned by the Mahayuti government – MLA Ashutosh Kale
सौंदर्यीकरण, संरक्षणभिंत व मूलभूत सुविधांच्या कामांना सुरुवात
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir 12Dec 15.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कुंभारी येथील पौराणिक आणि ऐतिहासिक असलेल्या राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासाला अखेर वेग आला आहे. आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारने १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर परिसरात सौंदर्यीकरणासह विविध सुविधा उभारणीची कामे सुरू झाली असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे प्राचीन देवस्थान कुंभारीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. विशेषतः श्रावण महिना आणि महाशिवरात्रीत येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरातील सुविधा अपुऱ्या असल्याने भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. देवस्थानाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या निधीची गरज होती.
या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या राज्य संरक्षित स्मारक योजनेतून निधीची मागणी केली होती. त्याची दखल घेत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंदिराच्या इतिहासात एवढा मोठा निधी प्रथमच मिळाल्याने स्थानिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
निधी अंतर्गत संरक्षणभिंत बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसविणे, परिसराचे सुशोभीकरण, प्रकाशयोजना आणि मूलभूत सुविधा उभारणी या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर देवस्थान अधिक आकर्षक, सुरक्षित आणि भाविकांसाठी सोयीस्कर होणार आहे.
निधी मंजुरीबद्दल आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
राघवेश्वर महादेव मंदिर नव्या रुपात खुलणार असल्याने भाविकांच्या श्रद्धेला नवी ऊर्जा मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Post Views:
63





