कोपरगावच्या विकासासाठी राष्ट्रवादी एकजूट — प्रभाग २ मधील सभेत आ. आशुतोष काळेंची ग्वाही
Nationalist Congress Party united for the development of Kopargaon — MLA Ashutosh Kale’s assurance at a meeting in Ward 2.
“प्रलंबित प्रश्नांना पूर्णविराम… रस्ते, पाणी व स्वच्छतेची कामे मार्गी; आपल्या माणसालाच संधी द्या” — काळे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir 12Dec 18.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश (काका) कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल शिरसाठ व सौ. स्मिता साबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आ. आशुतोष काळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचे चित्र स्पष्टपणे मांडले.
काळे म्हणाले, “समता नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था पाहून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. बहुतांश रस्त्यांचे पेव्हिंग ब्लॉक काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांचे काम काही महिन्यांत पूर्ण होईल. प्रभागातील अडचणी कायमस्वरूपी दूर करणार आहोत.”
शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणेच उपनगरांनाही विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेत असल्याचे ते म्हणाले. सर्व गटारी भूमिगत करून एसटीपी प्रकल्पाद्वारे सांडपाणी प्रक्रिया करून तेच पाणी बांधकाम, बगीचे आणि रस्ते स्वच्छतेसाठी वापरण्याचा आराखडा त्यांनी मांडला. “शहराला स्वच्छ-सुंदर बनवणे हेच लक्ष्य आहे. प्रत्येक प्रभागात ओपन स्पेसमध्ये आधुनिक गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक उभारणार आहोत,” अशी घोषणा त्यांनी केली.
पाणीपुरवठ्याच्या विषयावर बोलताना त्यांनी २०१६ ची कठीण परिस्थिती आठवली. पाच नंबर साठवण तलावामुळे शहराला आता ४ दिवसांनी पाणी मिळू लागल्याचे सांगत त्यांनी पुढील योजना — एक ते चार नंबर तलावांची खोली वाढवणे, तळ्यांचे सिमेंट कॉंक्रिटकरण आणि सोलर प्लांट उभारणी — यांची माहिती दिली. “वीज खर्च कमी झाला की नागरिकांच्या पाणीपट्टीवर बोजा वाढणार नाही,” असा दावा त्यांनी केला.
विरोधकांवर टीका करताना काळे म्हणाले, “२८ विकासकामांना विरोध करीत न्यायालयातून स्थगिती घेतली, त्यात प्रभाग २ मधील चार रस्त्यांचा समावेश होता. चाळीस वर्षे मुद्दाम प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. प्रभाग २ ला आपल्या हक्काचा माणूस पालिकेत हवा.”
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले, “कोपरगावचा विकास हा आ. काळे यांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेलं ऐतिहासिक मताधिक्य हेच जनतेचा विश्वास. नगरपालिका सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली असावी, हेच आमचे ध्येय.”
सभेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, संदीप कोयटे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, तुषार साठे यांच्यासह पक्षाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Post Views:
48





