भाजप–मित्रपक्षांची विजयी लाट-वैभव आढाव 

भाजप–मित्रपक्षांची विजयी लाट-वैभव आढाव

The victorious wave of BJP and its allies – Vaibhav Adhav

प्रचारात वाढता वेग सत्तेचा ठाम  विश्वास

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir 12Dec 19.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि मित्रपक्षांनी जनमानसात आणखी मजबूत पकड निर्माण केली असून, शहरभर ‘कमळ-कोल्हे’ संयोजनाची जोरदार हवा दिसत आहे. प्रभाग १ चे उमेदवार वैभव आढाव यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, “जनतेने यावेळी सत्ता ठामपणे आमच्या हातात द्यायची ठरवली आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यातील प्रचाराने विरोधकांना थोडीशी उभारी मिळाली असली तरी भाजप-कोल्हे कुटुंबाची विकासाभिमुख भूमिका, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि शहरासाठी आखलेली ठोस कामांची दिशा पाहून मतदार पुन्हा एकदा या महायुतीसोबत येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, सर्वच प्रभागांमध्ये वातावरण भाजप-मित्रपक्षांच्या बाजूने झुकल्याचे आढाव यांनी सांगितले. “२० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत पराग संधान नगराध्यक्ष पदावर विक्रमी मतांनी विजयी होतील,” असा ठाम दावा त्यांनी केला.

प्रभाग १ मध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे या भागाचा शहरात समावेश होऊन हद्दवाढ झाली. त्यानंतर रस्ते, पाणी, सांडपाणी, उद्याने यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांना चालना मिळाली. अनेक वर्षे विकासापासून वंचित असलेल्या या प्रभागाच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ठोस निधी मिळावा यासाठी भाजप-मित्रपक्ष प्रयत्नशील आहे.

शहरातील नागरिक मात्र यावेळी एकवटले आहेत.“विकासासाठी साथ” देण्याचा निर्धार त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच संधी देण्याची भावना जनतेमध्ये इतकी दृढ झाली आहे की पुढील पाच वर्षे कोपरगावचा दर्जा उंचावण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून भाजप-मित्रपक्षांवरच त्यांनी विश्वास ठेवला आहे.

कोपरगावमध्ये विकासाचा मार्ग आता अधिक स्पष्टपणे दिसू लागला असून, हा विश्वास आगामी निकालात विक्रमी मतांतून उमटेल, असा विश्‍वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page