२५ वर्षांनंतरही शहर माझ्या कामांची साक्ष देतंय – राजेंद्र झावरे
Even after 25 years, the city bears witness to my work – Rajendra Jhavare
विरोध, निधीअभावीही झावरे यांनी घडवला विकासाचा इतिहास
Despite opposition and lack of funds, Zaware created a history of development.
शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue 16Dec 20.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :““२००१ साली कोपरगावकरांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं. आजही शहरात उभ्या असलेल्या इमारती, रस्ते आणि सुविधा माझ्या कामांची साक्ष देत उभ्या आहेत,” असा ठाम दावा शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी केला. नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून थेट निवडणूक होत असताना त्यांनी पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत.
प्रश्न : २००१ मध्ये परिस्थिती कठीण असतानाही कामे कशी झाली?
झावरे :
त्या काळात पालिकेला तुटपुंजा निधी मिळत होता. सरकार व लोकप्रतिनिधी विरोधात होते. नगरसेवकांची संख्या कमी असूनही टोकाचा विरोध सहन करत केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर निर्णय घेतले. स्टेशन रोडचा अनेक वर्षांचा प्रश्न न्यायालयीन निर्णयातून निकाली काढत विस्थापितांना सुसज्ज गाळे मिळवून दिले निधी नव्हता, पाठबळ नव्हतं; तरीही शहरातील काम थांबवलं नाही’
प्रश्न : व्यापारी व विस्थापितांसाठी कोणती ठोस कामे केली?
झावरे :
शाळा नं. १ येथील सात वर्षे पडून असलेले गाळे दिलाव करून पालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवले. गाळे दलालांना नाही, तर गरजू व्यावसायिकांना’दिले.बां गडी चाळीचा प्रश्न सोडवताना मुस्लिम समाजाला विश्वासात घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम व्यापारी संकुल उभारले. आज ती शहराची ओळख ठरली आहेत. बँक रोड, गुरुद्वारा रोडवरील भाजी विक्रेत्यांसाठी नेहरू भाजी मार्केट उभारले. रस्ते मोकळे करून स्वच्छता केली.
प्रश्न : मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेबाबत काय काम झाले?
झावरे :
घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती सुरू करून उत्पन्न वाढवले. अमरधाम व स्मशानभूमींचा विकास केला. जलशुद्धीकरणासाठी स्वतंत्र २४ तास वीज वाहिनी, क्लोरीन गॅस यंत्रणा सुरू केली. दिवसा आड नियमित पाणीपुरवठा पाच वर्षे अखंड सुरू ठेवला.पालिकेची थकीत वीजबिले व पाणीपट्टी भरून आर्थिक शिस्त लावली.
प्रश्न : पायाभूत सुविधा आणि रस्ते?
झावरे :
गोदावरीवरील संत जनार्दन स्वामी महाराज सेतू मजबूत करून उंची वाढवली. साई तपोभूमी ते स्वामी समर्थ मंदिर पालखी मार्ग तयार केला. धारणगाव रोड, इंदिरापथ रस्त्यांचे विस्तारीकरण केले. वहाडणे घाट निर्मिती करून सुशोभीकरण केले.
प्रश्न : शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनाबाबत भूमिका?
झावरे :
पालिकेच्या शाळांची दुरुस्ती लोकवर्गणीतून केली. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना वर्ग दिले. कार्यालयीन शिस्त, आर्थिक शिस्त लावली. भ्रष्टाचाराला आळा घालताना कर्मचाऱ्यांचा रोषही सहन केला, पण नागरिकांच्या कामांना वेग दिला. शासकीय शिवजयंतीला सार्वजनिक रूप देऊन शाळेतील विद्यार्थींना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले एक ऐतिहासिक उत्सव सुरू केला.
प्रश्न: शहराची ओळख निर्माण करण्यासाठी काय केले ?
झावरे :
शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि सांस्कृतिक ओळख ठळक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती करून ते शहरात उभे करण्यात आले. या पुतळ्यांमुळे कोपरगावच्या चौकांना इतिहास, सामाजिक जाणीव आणि प्रेरणेची नवी ओळख मिळाली.
त्याचबरोबर जिजामाता उद्यान व शिवाजीनगर उद्यानांचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी हिरवळीचे श्वासस्थान निर्माण करण्यात आले. शहरातील अमरधामचे विस्तारीकरण व सुशोभीकरण करत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा वाढविण्यात आल्या. या कामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडलीच, पण नागरिकांच्या दैनंदिन गरजांनाही माणुसकीचा आधार मिळाला.
प्रश्न : पुन्हा संधी मिळाल्यास प्राधान्य काय?
झावरे :
धुळमुक्त कोपरगाव, स्वच्छ शहर आणि नियमित पाणीपुरवठा हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. अनुभवाच्या जोरावर अधिक ठोस आणि जास्त कामे करून दाखवणार.
प्रश्न : तुम्ही शेवटी कोपरगावकरांना काय संदेश देणार?
झावरे:
“मी पाच वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही. २४ तास नागरिकांच्या सेवेत होतो. राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीने काम केले. आजही ती कामे बोलकी आहेत,” असे सांगत राजेंद्र झावरे यांनी मतदारांना पुन्हा विश्वास देण्याचे आवाहन समारोप करताना त्यांनी केले.
Post Views:
87





