पाणीप्रश्न सुटला, समाजमंदिर उभे; नगराध्यक्षपदी काका कोयटेच हवे – आ. आशुतोष काळे

पाणीप्रश्न सुटला, समाजमंदिर उभे; नगराध्यक्षपदी काका कोयटेच हवे – आ. आशुतोष काळे

Despite opposition and lack of funds, Zaware created a history of development.

कोपरगावच्या विकासाची पताका राष्ट्रवादीकडेच!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue 16Dec 20.40Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :-कोपरगाव शहराच्या विकासावर केवळ घोषणा नव्हे तर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व कोणाचे, हे कोपरगावकरांनी अनुभवलं आहे, तेव्हा नगराध्यक्ष पदासाठी काका कोटी यांनाच संधी द्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले 

विरोधकांवर अप्रत्यक्ष पण धारदार शब्दांत हल्ला चढवतांना पिण्याच्या पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न मार्गी लावला, रस्ते, गटारी, नागरी सुविधा उभ्या केल्या आणि त्याचबरोबर प्रत्येक समाजाच्या मागणीनुसार समाजमंदिर व सभागृहांसाठी निधी दिला—हे काम बोलतं आहे, बाकी फक्त आरोपांची धूळफेक आहे, असा टोला त्यांनी लगावला.

प्रभाग क्र. १५ मधील कॉर्नर सभेत बोलताना आ. काळे म्हणाले, “समाजाशी नाळ जुळलेले, सर्वधर्मीयांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आज कोपरगावला मिळत आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने नगराध्यक्षपदासाठी सक्षम आणि विश्वासार्ह चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. मी शहराच्या रखडलेल्या विकासाला गती दिली; पुढील काळात काकासाहेब कोयटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कोपरगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारच.”

विरोधक फक्त विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असताना, प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक समाजाच्या मागण्यांना न्याय दिला आहे, असे सांगत आ. काळे पुढे म्हणाले. समाजमंदिर, सभा मंडप, मस्जिद, कब्रस्तान, दफनभूमी आणि स्मशानभूमीच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र येण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, हा दृष्टिकोन होता—आणि तो प्रत्यक्षात उतरवला, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

आज समाजमंदिर आणि सभा मंडपांमध्ये सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, मार्गदर्शन शिबिरे आणि चर्चासत्रे होत आहेत. यातून कोपरगावातील सामाजिक एकोपा अधिक बळकट झाला आहे. हा एकोपा टिकवून शहराला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी ज्या विश्वासाने २०१९ आणि २०२४ मध्ये साथ दिली, तोच विश्वास येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात सत्ता आली, तर विकासाचा वेग दुप्पट होईल. नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या—कोपरगाव विकासात अव्वल केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा ठाम विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त करत प्रचाराला धार दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page