स्मार्ट सिटी कुणी पळवली? उतारेच सांगतील नावं-सुनील गंगुले

स्मार्ट सिटी कुणी पळवली? उतारेच सांगतील नावं-सुनील गंगुले

Who stole the Smart City project? The documents will reveal the names – Sunil Gangule

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 21.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव  :जोपर्यंत कोपरगावकर पाण्यासाठी वणवण करतील, तोपर्यंत विरोधकांच्या राजकीय साम्राज्याला धक्का बसणार नाही, या गैरसमजातूनच २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत मोठमोठ्या सभा घेतल्या गेल्या. मुख्यमंत्री सभेत येऊन पाणी देण्याचे आश्वासन दिले गेले; मात्र आमदार, राज्य आणि केंद्रात स्वतःचेच सरकार असतानाही कोपरगावकरांना पाणी देता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

चांगले झाले तर “आम्ही केले” आणि काही चुकले तर “आ. आशुतोष काळे यांच्यामुळे झाले” हा एककलमी कार्यक्रम विरोधकांचा असून तो आजही सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केला.

कोपरगाव शहरातील एका कॉर्नर प्रचार सभेत बोलताना गंगुले यांनी स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर नेल्याचा आरोप पूर्णपणे हास्यास्पद व बिनबुडाचा असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, स्मार्ट सिटी ज्या ठिकाणी संभाव्य आहे, त्या जागेचे उतारे कोपरगावकरांनी एकदा तपासावेत. उताऱ्यावरची नावे पाहिल्यावर स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर कोणी नेली, हे लोक स्वतःच ठरवतील.”

गंगुले यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर गेली तेव्हा आमदार सौ. स्नेहलता कोल्हे होत्या आणि सरकारही त्यांचेच होते. त्या काळात आ. आशुतोष काळे यांच्याकडे कोणतीही सत्ता नसताना त्यांनी स्मार्ट सिटी बाहेर कशी नेली, हा प्रश्नच निरर्थक आहे.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या महसूल मंत्र्यांच्या सभेत केलेले आरोप म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून, निळवंडे पाणीप्रश्नी जसे झाले तसेच उताऱ्यांच्या बाबतीतही होईल, हे कोपरगावकरांना चांगलेच ठाऊक आहे, असा टोला त्यांनी लगावला.

स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि दोष दुसऱ्यावर ढकलायचा हा विरोधकांचा जुना उद्योग आहे. पण आता सत्य जनतेसमोर येत आहे. उताऱ्यावरची विवेक कोल्हे व पराग संधान यांची नावे पाहिल्यावर  कोपरगावकरांना कोण खोटे बोलते आहे, हे समजेल,” असे सांगत गंगुले यांनी विकासाला विरोध करणाऱ्या संधीसाधू विरोधकांना कोपरगावचे सुज्ञ मतदार योग्य धडा शिकवतील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page