कोपरगावात कमळ फुललं! दुरंगी लढतीत पराग संधान विजयी; महिला मतांचा कौल निर्णायक

कोपरगावात कमळ फुललं! दुरंगी लढतीत पराग संधान विजयी; महिला मतांचा कौल निर्णायक

The lotus has bloomed in Kopargaon! Parag Sandhan emerges victorious in a two-way contest; women’s votes prove decisive.

भाजप मित्र पक्षांना १९ जागा तर घड्याळाला ११ जागांवर समाधान

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSum21 Dec 19.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी अखेर स्पष्ट कौल दिला आणि पराग संधान (कमळ) यांच्या पारड्यात विजय टाकला. ६८.१६ टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या या चुरशीच्या लढतीत तिरंगी संघर्षाचा फायदा घेत पराग संधान यांनी अटीतटीच्या लढाईत ४०९ मतांनी निर्णायक  विजय खेचून आणला.

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच रंगत वाढवत गेलेल्या या प्रचारात शेवटच्या टप्प्यात महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरला. महिला मतदानात कमळला मिळालेली आघाडी, कोल्हे परिवाराने केलेली प्रतिष्ठेची लढाई, संघटनाची ताकद आणि शिस्तबद्ध प्रचार यामुळे पराग संधान यांची बाजू भक्कम झाली.

घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारे काका कोयटे यांनी नवीन शहर भाग आणि काही वॉर्डमध्ये जोरदार पकड दाखवली. मात्र मशाल व अपक्ष उमेदवारांमुळे झालेले मतविभाजन त्यांच्या अडचणीचे ठरले. राजेंद्र झावरे (धनुष्यबाण) यांनी काही भागात आघाडी घेतली, पण ती संपूर्ण शहरात पोहोचू शकली नाही.

दरम्यान, भरत मोरे (मशाल) आणि विजय वहाडणे (बॅट – अपक्ष) यांनी मिळवलेल्या मतांमुळे लढत तिरंगीच राहिली आणि त्याचा थेट फायदा कमळ उमेदवाराला झाला.

एकूण पडलेले मते

पराग संधान (कमळ) १८५०३मतं ४०९मतांनी – (विजयी)

 काका कोयटे (घड्याळ)१८०९४मतं (पराभूत)

 राजेंद्र झावरे (धनुष्यबाण)३४९६मतं

 सपना मोरे (मशाल)२१७६मतं

विजय वहाडणे( बॅट)५९१मतं

काय म्हणाल्या स्नेहलता कोल्हे

“कोपरगावच्या जनतेने दिलेला हा कौल म्हणजे कोल्हे परिवारावर व्यक्त केलेला निखळ विश्वास आहे. नगराध्यक्षासह पूर्ण बहुमत देत जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की विकास, विश्वास आणि सातत्य यांच्याच पाठीशी कोपरगाव उभा आहे,” अशी ठाम प्रतिक्रिया माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निर्णयाक विजयानंतर व्यक्त केली.

त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरगावच्या विकासासाठी दिलेल्या आश्वासनांवर जनतेने विश्वास ठेवला आहे. हा विजय केवळ निवडणुकीचा नाही, तर विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.”

विरोधकांवर टीका करताना कोल्हे म्हणाल्या, “जनतेने आज विकृती, अपप्रचार आणि वैयक्तिक द्वेषाच्या राजकारणाला चोख उत्तर दिले आहे. कोपरगावकरांनी सकारात्मकतेची, संस्कारांची आणि विकासाची निवड केली असून हा विरोधकांच्या नकारात्मक मानसिकतेचा पराभव आहे.”

शेवटी मतदारांप्रती ऋण व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “या ऐतिहासिक विश्वासासाठी कोपरगावच्या प्रत्येक मतदाराप्रती आम्ही ऋणी आहोत. हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अधिक ताकदीने काम करू.”

स्व. शंकरराव कोल्हे माझे वडील स्व. शिवाजीराव संधान व जनतेला समर्पित

पराग संधान म्हणाले,“हा विजय माझा नसून कोपरगावच्या जनतेचा आहे. बिपिन कोल्हे आमदार स्नेहलता कोल्हे  युवा नेते विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे या सह संपूर्ण  कोल्हे परिवार मित्र परिवार व माझे सहकारी उमेदवार या सर्वांच्या एकत्रित  प्रयत्नातून झाला आहे. हा विजय स्वर्गीय शंकरराव कोल्हे व या शहरातील जनतेला मी समर्पित करतो शहराच्या विकासासाठी कोणताही भेदभाव न करता काम करू.”

निकाल जाहीर होताच शहरात जल्लोष उसळला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी कोपरगावचा परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.

Leave a Reply

You cannot copy content of this page