कोपरगावचा कौल ‘भूतो न भविष्यती’ एकहाती सत्तेसाठीच- विवेक कोल्हे

कोपरगावचा कौल ‘भूतो न भविष्यती’ एकहाती सत्तेसाठीच- विवेक कोल्हे

The verdict from Kopargaon is unprecedented – a mandate for absolute power – Vivek Kolhe.

भाजप–मित्र पक्षांच्या ऐतिहासिक विजयात विरोधकांचाही वाटा; जनतेने विसंगतीला पूर्णविराम दिला – विवेक कोल्हे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue23 Dec 8.40Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :भाजप व मित्र पक्षांना कोपरगाव नगरपालिकेत मिळालेले घवघवीत यश हे केवळ विजय नसून गेल्या चार दशकांच्या राजकीय विसंगतीला छेद देणारे ऐतिहासिक आणि ‘भूतो न भविष्यती’ यश असल्याचे स्पष्ट मत भाजप मित्र पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. नगराध्यक्षासह तब्बल १९ नगरसेवकांचा एकहाती कौल देत कोपरगावकरांनी विश्वासाचा कौल दिल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

सोमवारी(२२) दुपारी ३ वाजता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित जनतेच्या आभार प्रदर्शनार्थ पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विवेक कोल्हे म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत ज्या-ज्या वेळी जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला, त्या त्या वेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांचे होते. त्यामुळे शहराचा विकास नेहमीच विसंगतीत अडकला. यावेळी मात्र कोपरगावकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत, नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत देऊन एकहाती सत्तेचा कौल दिला.”

हा एकाचा नव्हे, सर्वांचाच विजय

हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नाही,” असे सांगत विवेक कोल्हे म्हणाले, “पक्षाचे कार्यकर्ते, मार्गदर्शक बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, माझी आजी, संपूर्ण कोल्हे कुटुंब आणि ज्ञात-अज्ञात, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचा हा विजय आहे.”खरे तर

विरोधकांनीच आमच्या विजयात हातभार लावला,विरोधकांवर मिश्किल पण बोचरा टोला लगावत ते म्हणाले, “प्रचारात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्यावर केलेली वक्तव्ये आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा एकेरी उल्लेख जनतेला रुचला नाही. विकासापासून भरकटवण्याचा प्रयत्न कोपरगावकरांनी साफ नाकारला. त्यामुळे आमच्या विजयात विरोधकांचाही हातभार लागला, हे वास्तव आहे.” असाही चिमटा त्यांनी काढला.

सत्ता मिळाली आता शहराचे कोणते तीन प्राधान्य क्रमाचे तुमच्या  दृष्टीने आहेत यावर बोलताना ते म्हणाले रस्ते, पाणी, आरोग्य हे तीन प्राधान्यक्रम असतील.

विरोधकांच्या सूचना स्वीकारणार का याबाबत या प्रश्नावर ते म्हणाले, “शहरहिताच्या, विकासाला पूरक असलेल्या सूचना नक्कीच स्वीकारू. मात्र कामात खोडा घालणाऱ्या सूचना मान्य केल्या जाणार नाहीत.” असं ठणकावून सांगितले

 निवडणुकीत एआय व ट्रोलिंगच्या वापरावर ते म्हणाले, “हे रिकामटेकड्या लोकांचे काम आहे. त्याचा फारसा काही फरक पडत नाही,” असे म्हणत त्यांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले.

पराभूतांना सन्मान, पाठबळाचे आश्वासन

पराभूत उमेदवारांना उद्देशून विवेक कोल्हे म्हणाले, “खचून जाऊ नका. नगराध्यक्ष आपलाच आहे. स्वतःला नगरसेवक समजा. तुम्हाला मान-सन्मान आणि पाठबळ दिले जाईल.”

आपण लढलो, भिडलो आणि जिंकलो,” असे ठाम सांगत नव्या वर्षात नगराध्यक्ष व नगरसेवक पदभार स्वीकारतील, असेही त्यांनी जाहीर केले.

यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, “आम्ही जाती-पातीपेक्षा गुणवत्ता, ताकद आणि सातत्य पाहून उमेदवार दिले. महिलांची मते निर्णायक ठरली. अनुभवी उमेदवारासमोरही नऊ वर्षांपासून जनतेसाठी झटणाऱ्या साध्या-सोप्या उमेदवार पराग संधानला कोपरगावकरांनी पसंती दिली.”

चार वर्षांच्या प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्या म्हणाल्या, “आम्ही याबाबत श्वेतपत्रिका काढणार आहोत.”

नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, “जनतेने आम्हाला मोठा कौल दिला आहे. आता राजकारण संपले. विरोधक असले तरी त्यां ११ जणांना  विश्वासात घेऊन काम करू. नगरसेवक म्हणून त्यांना सन्मान दिला जाईल.”

१०० दिवसांत १०० कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही दिलेल्या विश्वासनाम्यावर काम करू,” असे सांगत त्यांनी कोपरगावकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान, केशवराव भवर, विश्वास महाले, दिलीप दारूणकर, नारायण शेठ अग्रवाल, शरद नाना थोरात, दत्ता काले, अतुलशेठ काले, नसीरभाई सय्यद, राजेंद्र बागुल यांच्यासह भाजप मित्र पक्षाचे विजयी व पराभूत उमेदवार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page