कोपरगावचा कौल आणि आकड्यांचे अदृश्य राजकारण

कोपरगावचा कौल आणि आकड्यांचे अदृश्य राजकारण

The verdict of Kopargaon and the invisible politics of numbers

तीन–तेरा पराभूत, सतरा–दोन सत्तेवर!

Three-thirteen defeated, seventeen-two in power!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun28 Dec 15.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल केवळ सत्तांतरापुरता मर्यादित राहिला नाही; तर तो आकड्यांच्या अद्भुत, अजब आणि धक्कादायक करामतीमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. मताधिक्य, प्रभागरचना, उमेदवारांचे गणित—हे सगळे बाजूला ठेवले, तरी या निवडणुकीत ‘तीन’, ‘तेरा’ आणि ‘सतरा’ या आकड्यांनी कोपरगावच्या राजकारणावर गूढ छाया टाकली, हे नजरेआड करता येणार नाही. ही निवडणूक म्हणजे राजकारणाचे मैदान कमी आणि आकड्यांचे युद्ध अधिक वाटावे, अशीच ठरली.

३१, ४ आणि अडथळ्यांचे वर्तुळ : कोयटे यांचे आकड्यांत अडकलेले राजकारण

काका कोयटे यांची जन्मतारीख २३/९/१९५२. या तारखेची बेरीज केली, तर ३१ हा अंक समोर येतो आणि त्याची पुनर्बेरीज केली असता भाग्यांक ‘४’ मिळतो. सामान्यतः स्थैर्य, शिस्त, ताकद आणि ठाम निर्णयाचे प्रतीक मानला जाणारा ‘४’ हा अंक यंदाच्या निवडणुकीत मात्र कोयटेयांच्यासाठी अडथळ्यांचा आकडा ठरला.ज्या आकड्याने आयुष्य घडते, तोच आकडा निवडणुकीत आडवा का आला? हा प्रश्न या निकालानंतर कोपरगावच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चिला जात आहे.

तीन आणि तेरा : योगायोग की संकेत?

या निवडणुकीत ‘तीन’ हा आकडा वारंवार पुढे येतो. तब्बल तीन नगराध्यक्षांसह ५१ उमेदवारांची अनामत जप्त झाली. इथूनच ‘तीन’ची चर्चा सुरू झाली.

कोयटे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ची पहिल्या टप्प्यातील मतमोजणी ३ तारखेला अपेक्षित होती; मात्र ती पुढे ढकलण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात मतमोजणी २१ तारखेला झाली—२+१ = ३. पुन्हा तोच आकडा!

कोयटे यांच्या विजयाचा मार्ग रोखणारेही राजेंद्र झावरे, सपना मोरे आणि विजय वहाडणे—हे तीनच उमेदवार ठरले.

३१, १३ आणि पराभवाचा पाठलाग

२००२ साली काका कोयटे यांचा ३१ मतांनी पराभव झाला होता. तब्बल २३ वर्षांनंतर यंदा त्यांना ४०९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ४+०+९ = १३. म्हणजे कधी ३१, तर कधी १३—हे आकडे त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाठलाग करत राहिले.

बालेकिल्ला असूनही तीन अंकी आघाडी!

प्रभाग क्रमांक ३ मध्ये चार अंकी आघाडीची अपेक्षा असताना, कोयटे यांना केवळ २९८ मतांची (तीन अंकी) आघाडी मिळाली.

प्रभाग १, २ आणि ३ या तीन प्रभागांत त्यांनी एकूण ७७५ मतांची आघाडी घेतली; मात्र सहापैकी पाच नगरसेवक निवडून देणारी ही आघाडीही तीन अंकीच ठरली.

प्रभागनिहाय आकड्यांचा खेळ

प्रभाग १ मध्ये कोयटे यांना १२९० मते मिळाली (१+२+९+० = १+२=३

आघाडी २६४ मतांची (२+६+४ = १+२=३

मतमोजणीची सुरुवातही तीन अंकी आकड्यांनीच झाली.

खरी कलाटणी मात्र प्रभाग ४, ५ आणि ६ मध्ये लागली.

प्रभाग ४ : ९०४ मते (९+०+४ = १३)

प्रभाग ५ : ७२४ मते (७+२+४ = १३)

प्रभाग ६ : ११९१ मते १+१+९+१ =१+२=३

या तीन प्रभागांत संधान यांना १३८८ मतांची आघाडी मिळाली.

१–२–३ मधील ७७५ आणि ४–५–६ मधील १३८८ वजा जाता, संधान यांना ६१३ मतांची निर्णायक आघाडी मिळाली—इथेही ‘तेरा’चा ठसा.

निसटते पराभव आणि तीन प्रभागांचा फटका  प्रभाग १ब मध्ये सचिन गवारे २४ मतांनी,प्रभाग ४अ मध्ये रंजना गवळी २८ मतांनी,प्रभाग ६ब मध्ये मुकुंद भुतडा ५७ मतांनी पराभूत झाले.हे तीन उमेदवार, तीन प्रभाग आणि निसटते पराभव याचा एकत्रित फटका कोयटे यांना बसला.

NOTA आणि विरोधक : तीनचा गुणाकार

राजेंद्र झावरे, सपना मोरे, विजय वहाडणे आणि NOTA यांची एकत्रित मते ६६५४ झाली. ६+६+५+४ = २+१=३ म्हणजेच पुन्हा तीनचा गुणाकार!

तीन–तेरापलीकडे ‘सतरा’चा उदय : संधान यांचा लकी नंबर

जिथे कोयटे यांच्या वाट्याला तीन–तेराचे गूढ आले, तिथे पराग संधान यांच्या विजयावर मात्र ‘१७’ या आकड्याची ठळक छाप उमटली.संधान यांना एकूण १८,५०३ मते मिळाली. १+८+५+०+३ = १७

NOTA मते ३८६—३+८+६ = १७

एकूण मते, नोटा आणि विजय तीनही ठिकाणी सतरा!

जन्मतारीख, वय आणि सत्तांतराचा संकेत

पराग संधान यांची जन्मतारीख १७/९/१९७४—मूळ अंकच १७.

पूर्ण बेरीज केल्यास भाग्यांक २—समन्वय, संयम आणि योग्य क्षणी संधी साधणारा अंक.

आकड्यांचा आणखी एक विलक्षण योगायोग म्हणजे—

काका कोयटे यांचे जन्मवर्ष १९५२ = संधान यांचे चालू वय (५२)

संधान यांचे जन्मवर्ष १९७४ = कोयटे यांचे चालू वय (७४)

ही केवळ आकडेमोड नाही; 

एकीकडे अनुभव, परंपरा आणि बालेकिल्ले असूनही काका कोयटे यांचे राजकारण तीन–तेराच्या वर्तुळात अडकले.

दुसरीकडे, वेळ, वय, संयम आणि ‘१७’ या आकड्याची साथ लाभलेल्या पराग संधान यांनी सत्ता खेचून आणली.

हा राजयोग कि निव्वळ योगायोग म्हणावा का राजकारणातील गणिती वास्तव यावर मतभेद असतील.मात्र एक गोष्ट निश्चित; कोपरगावची ही निवडणूक ‘आकड्यांनी सांगितलेला निकाल’ म्हणून इतिहासात नोंदली जाणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page