राष्ट्रीय उपक्रमांमुळे शहराच्या सांस्कृतिक-आध्यात्मिक वैभवात भर – आ. आशुतोष काळे

राष्ट्रीय उपक्रमांमुळे शहराच्या सांस्कृतिक-आध्यात्मिक वैभवात भर – आ. आशुतोष काळे

National initiatives add to the cultural and spiritual glory of the city – MLA Ashutosh Kale

कोपरगावमध्ये अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाची भव्य दिमाखात सुरुवात

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun28 Dec 19.10Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगावच्या धार्मिक-आध्यात्मिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणारे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन गुरु शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव (बेट) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. परम सदगुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्ट, कोपरगाव (बेट) व चिरायू ज्योतिष, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनास आमदार  आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून आयोजकांना व सहभागी तज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या.

या अधिवेशनात देशभरातून आलेले प्रख्यात ज्योतिषाचार्य, संत-महंत, संशोधक व अभ्यासक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून, भारतीय ज्योतिषशास्त्रातील संशोधन, परंपरा व आधुनिक दृष्टिकोन यांचा संगम साधण्यात येत आहे. अशा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमांमुळे कोपरगावचा सांस्कृतिक व आध्यात्मिक नावलौकिक अधिक व्यापक स्तरावर पोहोचत असल्याचे मत आमदार आशुतोषदादा काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

कोपरगाव ही केवळ औद्योगिक व शैक्षणिकच नव्हे, तर आध्यात्मिक परंपरेची भूमी असल्याचे सांगत, गुरु शुक्राचार्य मंदिरासारख्या पवित्र स्थळी होणारी ही राष्ट्रीय परिषद भाविकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून नव्या पिढीला भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परम सदगुरु शुक्राचार्य देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, देशभरातून आलेले ज्योतिष तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या अधिवेशनामुळे कोपरगावच्या लौकिकात मानाचा शिरपेच रोवला गेला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page