एकोणावीस प्लस वनचा ‘लोकमान्य’ फॉर्म्युला!
The ‘Lokmanya’ formula of nineteen plus one!
कोपरगाव नगरपालिकेत लोकमान्य आघाडी सत्तेवर; प्रसाद आढाव गटनेतेपदी
The Lokmanya Alliance is in power in the Kopargaon Municipality; Prasad Adhav has been appointed as the group leader.
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue30 Dec 12.20Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर कोपरगावच्या राजकारणात सत्तेची गणिते स्पष्ट झाली असून, भाजप व मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष व १९ नगरसेवकांच्या बळावर ‘लोकमान्य आघाडी’ अधिकृतपणे कार्यरत झाली आहे. सोमवारी (दि. २९) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासमोर लोकमान्य आघाडीची औपचारिक नोंदणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व गटनेते उपस्थित होते.

भाजप नगराध्यक्ष (कमळ) १४, (छत्री) ४ आणि कपबशी १ अपक्ष अशा नगराध्यक्ष सह १९+१ संख्याबळावर कोपरगाव नगरपालिकेचा कारभार आता लोकांनी मान्य केलेल्या लोकमान्य आघाडीच्या हाती गेला आहे. या आघाडीचे नेतृत्व नगराध्यक्ष पराग संधान करत असून, श्री उर्फ प्रसाद आढाव यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी शहर विकासाचा वेग वाढवणार असल्याचा निर्धार नगराध्यक्ष संधान यांनी व्यक्त केला.

“आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ शहर विकासालाच प्राधान्य दिले जाईल. सत्ताधारी–विरोधक असा भेद न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील. मात्र विकास कामांसाठी विरोधकांनीही सकारात्मक सहकार्य करावे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
लोकमान्य आघाडीच्या नोंदणीनंतर कोपरगावच्या नगरराजकारणात स्थैर्य आले असून, आगामी काळात विकास विरुद्ध राजकारण या लढतीत विकासालाच वरचष्मा देण्याचा संदेश या आघाडीने दिला आहे.
Post Views:
27