कोपरगावचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; पुन्हा चार दिवसाआड पाणी – सौ. गौरी पहाडे
Kopargaon’s water problem is on the verge of being resolved; water supply will resume every four days – Mrs. Gauri Pahade
आ. आशुतोष काळेंच्या हस्तक्षेपामुळे गोदावरी कालव्यात पाणी;
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनMon12 Jan 18.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याचे दिवस वाढविण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला होता. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे परिस्थितीत बदल झाला असून साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिका गटनेत्या सौ. गौरी पहाडे यांनी दिली.
सोमवार (दि. १२) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व बारा नगरसेवकांनी कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सौ. गौरी पहाडे म्हणाल्या की, मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी नगरपरिषद कार्यालयाला भेट दिली असता मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पाणी साठा कमी झाल्यामुळे चार दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यात बदल करण्यात आल्याची माहिती दिली होती.
कोपरगावकरांना पाण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पाटबंधारे विभागाने तत्काळ कार्यवाही करत गोदावरी कालव्यात पाणी सोडले असून साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
या निर्णयामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट दूर झाले असून आता कोपरगाव शहराला पूर्वीप्रमाणे चार दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा सौ. गौरी पहाडे यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका सौ. माधवी वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, जनार्दन कदम, सौ. निर्मला आढाव, सौ. स्मिता साबळे, इम्तियाज अत्तार, वाल्मिक लाहीरे, राहुल शिरसाठ, सौ. सोनम त्रिभुवन, सौ. सोनाली कपिले, बाळासाहेब रुईकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views:
26





