आ. आशुतोष काळेंच्या हस्तक्षेपाने सात नंबर पाणी अर्जांना दिलासा; २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

आ. आशुतोष काळेंच्या हस्तक्षेपाने सात नंबर पाणी अर्जांना दिलासा; २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

With MLA Ashutosh Kale’s intervention, applicants for water connection under category seven receive relief; the deadline has been extended until January 20th.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu15 Jan 19.10Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याने आ. आशुतोष काळे यांनी या विषयात लक्ष घातले. त्यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

मागील आठवड्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या सात नंबर अर्जांची अंतिम मुदत ०६ जानेवारी रोजी संपल्याचे स्पष्ट झाले. मात्र विविध कारणांमुळे काही शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप भरले गेले नसल्याने, उपस्थित शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आ. काळे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता जे लाभधारक शेतकरी अर्ज दाखल करू शकले नाहीत, त्यांना २० जानेवारीपर्यंत संधी देण्यात आली आहे.

रब्बी हंगामात पिकांना पाण्याची टंचाई भासू नये आणि एकही लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहू नये, यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणे आवश्यक असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित सिंचन शाखा कार्यालयात वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page