पराग संधान यांच्या नेतृत्वात तहसील मैदानात भाजीबाजार; कोंडीला पूर्णविराम

पराग संधान यांच्या नेतृत्वात तहसील मैदानात भाजीबाजार; कोंडीला पूर्णविराम

Under the leadership of Parag Sandhan, a vegetable market was set up in the Tehsil grounds; bringing an end to the congestion.

शिस्तबद्ध नियोजनाचा सकारात्मक परिणाम; 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun18 Jan 18.40Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव:  शहरातील दर रविवारी भरणारा भाजीपाला बाजार आता अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व नियोजनबद्ध स्वरूपात भरवण्यात येत असून, यामागे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या काटेकोर नियोजनाचा ठळक परिणाम दिसून येत आहे. कोपरगाव नगरपरिषदेने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरला असून, शहराच्या दैनंदिन व्यवस्थापनात मोठा बदल घडवून आणणारा आहे.

यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवर भरणाऱ्या भाजीपाला बाजारामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत होते. वाहनचालक, पादचारी, रुग्णवाहिका तसेच शालेय वाहनांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष पराग संधान यांनी पुढाकार घेत उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सखोल आखणी केली.

शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांशी थेट संवाद साधत, सर्व घटकांचे मत विचारात घेऊन एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रस्त्यावर बाजार न भरवता तो तहसील मैदानातील आखीव व निश्चित जागेत भरवण्याचे सुयोग्य नियोजन अमलात आणण्यात आले.

या नव्या व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटला असून रहदारी सुरळीत झाली आहे. भाजीपाला विक्रेत्यांना स्वतंत्र, मोकळी व सुरक्षित जागा उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्राहकांनाही स्वच्छ, प्रशस्त आणि एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला उपलब्ध होत असल्याने खरेदी अधिक सोयीची ठरत आहे.

नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून बाजाराची पाहणी करत व्यवस्थेवर लक्ष ठेवले. शिस्त, सुरक्षितता आणि सुव्यवस्था यांना चालना देणाऱ्या या निर्णयामुळे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नियोजनक्षम नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असून, कोपरगाव नगरपरिषद भविष्यातही अशाच जनहिताच्या व नियोजनबद्ध निर्णयांसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page