ऊर्जा 2.0’ने विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कला आणि मूल्यशिक्षणाचा संगम; 

‘ऊर्जा 2.0’ने विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कला आणि मूल्यशिक्षणाचा संगम; 

‘Energy 2.0′ combines students’ sports, arts, and values ​​education;

समता इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम ठरला स्मरणीय

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Fir6Feb.12.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: विकासालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज अधोरेखित करत ‘ऊर्जा 2.0’ हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धांपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण भविष्याला दिशा देणारा ठरला, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 

शिक्षणासोबत क्रीडा, कला व व्यक्तिमत्त्व विकासाचा समतोल साधणारा हा उपक्रम शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीपणे साकारला गेला. त्यामुळे ‘ऊर्जा 2.0’ दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्राचार्य समीर अत्तार यांनी मानले. खेळ हे केवळ शारीरिक क्षमता वाढवणारे नसून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण घडवणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल, संचालक गिरीश सोनेकर, निरव रावलिया, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अरविंद पटेल, संदीप कोयटे, अक्षरा पटेल, श्वेता अजमेरा, भरत अजमेरा, सिमरन खुबानी यांच्यासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पीआय संजय कोळी, कोपरगाव न्यायालयाचे न्यायाधीश युनूस तांबोळी, राहता न्यायालयाचे न्यायाधीश सैफुद्दीन शेख, शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक अमित शेळके, वैजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक विनोद राजपूत, शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडंट अमित कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

चौकट :

“आत्मविश्वास, धैर्य आणि सुसंस्कृतपणाचा संगम साधणारा हा उपक्रम कला-हस्तकला, विविध क्रीडा प्रकार आणि शैक्षणिक मूल्यांच्या माध्यमातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर साकारला. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रथमच असा प्रयोग पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी व्यक्त केली.”

Leave a Reply

You cannot copy content of this page