गौतम पॉलिटेक्निक–निलय ग्रुपमध्ये सामंजस्य करार;उद्योगाशी थेट जोड
Gautam Polytechnic and Nilay Group sign a memorandum of understanding; establishing a direct link with the industry.
विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, रोजगाराचे दार खुले
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Fir6Feb.13.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि नाशिक येथील जागतिक दर्जाची निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
या करारामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळून त्यांच्या रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असल्याचा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य वसीम शेख यांनी व्यक्त केला.
या कराराअंतर्गत अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. इलेक्ट्रिकल पॅनल निर्मिती आणि सीएनसी ऑपरेशन्समध्ये जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या निलय ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख करून दिली जाणार आहे.
करारानुसार, तृतीय वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य, तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच कंपनीतील तज्ज्ञांकडून वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन, कार्यशाळा आणि अपडेट सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य व आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या सामंजस्य करारामुळे गौतम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट, तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट नोकरीची संधी मिळणार आहे. बदलत्या औद्योगिक वातावरणात इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग व सीएनसी प्रोडक्शन–मेंटेनन्स क्षेत्रात गौतम पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आघाडीवर राहतील, असे प्राचार्य शेख यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा. नारायण बारे, निलय ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर गिरासे, कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views:
9





