कोपरगावात ‘बिझनेस एक्स्पो २०२६’चा १२ फेब्रुवारीला भव्य शुभारंभ

कोपरगावात ‘बिझनेस एक्स्पो २०२६’चा १२ फेब्रुवारीला भव्य शुभारंभ

The grand inauguration of ‘Business Expo 2026’ will take place in Kopargaon on February 12th.

१२ फेब्रुवारीला तहसील मैदान ते गांधी प्रदर्शनपर्यंत सांस्कृतिक रॅली; उद्योग, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Fir6Feb.13.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि भारतीय संस्कृतीचा जागर करणारा ‘बिझनेस एक्स्पो २०२६’ कोपरगावात १२ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या निमित्ताने शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसील मैदान ते महात्मा गांधी प्रदर्शन परिसरापर्यंत भारतातील विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य व संस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषद देण्यात आली.

या एक्स्पोचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे राहणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री लिमये व स्पृहा जोशी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, उपाध्यक्ष सुनील कोतवाल, गोदावरी पीक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे, कृष्णा एन्जोकेमच्या मीनल वर्मा व विक्रम वर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार अशोक काळे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, तहसीलदार महेश सावंत, काका कोयटे, आमदार सत्यजित तांबे, चैताली काळे, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, लायन्स प्रांत अधिकारी राजेश अग्रवाल, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, प्रांताधिकारी (शिर्डी) माणिकराव आहेर, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे, नगराध्यक्ष पराग संधान व गिरीश मालपाणी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

लायन्स क्लब व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने २११ स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यात ८० टक्के  कोपरगावकर व्यावसायिक, ६० क्रेडाई स्टॉल्स व ३० टक्के महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश मोफत राहणार आहे. अशी माहिती क्रेडाई अध्यक्ष व लायन संचालक राजेश ठोळे यांनी दिली.

भारतीय संस्कृती वारसा ही थीम असलेल्या या एक्स्पोमध्ये निबंध, चित्रकला, सुंदर अक्षर, कॉमेडी नाटक, नृत्य स्पर्धा, पेट कार्निवल, तसेच ‘जगातील आठ आश्चर्ये’ हे मुख्य आकर्षण असणार आहे. मनोरंजनातून सामाजिक संदेश देणारा हा उपक्रम कोपरगावच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. प्रास्ताविक लायन अध्यक्ष अक्षय गिरमे यांनी केले, मनोगत काळे कारखाना संचालक दिनार कुदळे, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गोदावरी दूध संघाचे मार्केटिंग मॅनेजर योगेश औताडे यांनी व्यक्त केले. प्रयोजनाबद्दल लायन सत्येन मुंदडा माहिती दिली, स्पर्धांची माहिती लिनेस सोनाली गिरमे यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती लायन राम थोरे यांनी दिली. सूत्रसंचालन लायन प्राध्यापक डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले शेवटी आभार लायन सुमित भट्ट यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page