कोपरगावकरांसाठी मोठा दिलासा; उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली १००% शास्ती माफीची ग्वाही-आ.आशुतोष काळे
Big relief for Kopargaonkars; Deputy Chief Minister Shinde assured 100% remission of punishment-A.Ashutosh Kale
निर्णय लवकरच लागू, कोपरगावकरांना लवकरच संपूर्ण शास्ती माफी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Wad11.9.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कोपरगावकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना भेट देऊन कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या थकीत मालमत्ता करावरील १००% शास्ती माफीसाठी निवेदन दिले. या भेटीत उपमुख्यमंत्री शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच माफीची ग्वाही दिल्याची माहिती आ. काळे यांनी सांगितली.
मंगळवार (दि.१०) रोजी झालेल्या या भेटीत आ. काळे यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य कोपरगावकरांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडू नये आणि नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महायुती शासनाने थकीत मालमत्ता करावरील दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने मागील वर्षीच महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, जो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे सादर झाला. आ. काळेंनी या प्रस्तावाची तातडीने मंजुरी होऊन कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजनेअंतर्गत कोपरगावकरांचा शास्ती माफ करावी अशी मागणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी या मागणीला मान्यता देत, कोपरगावकरांसाठी लवकरच १००% शास्ती माफी लागू होईल अशी ग्वाही दिल्याचे आ. आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Post Views:
23





