कोपरगाव: महाशिवरात्री यात्रा निविदा प्रकरणात घोटाळ्याचा संशय! गगन हाडांचा तिव्र आरोप
Kopargaon: Suspicion of scam in Mahashivratri Yatra tender case! Gagan Hada’s strong allegations
“ठराविक व्यक्तीसाठी निविदा आधीच ठरवली? पारदर्शकतेचा अभाव; प्रशासन अद्याप निष्क्रिय”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Tue10.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरात महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या शिव यात्रेच्या निविदा प्रक्रियेत घनघोर अनियमितता झाल्याचे आरोप उमेदवारांनी केले आहेत. निविदा प्रक्रियेत सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असताना, ठराविक व्यक्तीसाठी निविदा आधीच ठरवून देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख गगनाडा यांनी प्रसार माध्यमांसमोर केला आहे.
निवेदकांचे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीची निविदा अंतिम करण्यात आली, त्या अर्जावर दिनांकाचा उल्लेखही नाही, तरीही तो ग्राह्य धरून इतर उमेदवारांना बाजूला केले. “जर ठराविक व्यक्तीला आधीच निविदा देण्याचा निर्णय झाला होता, तर इतर उमेदवारांचा वेळ आणि खर्च का वाया घालवला?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अनेकांनी तर संपूर्ण निविदा प्रक्रिया फक्त दिखाव्यासाठी असल्याचेही सांगितले.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष गगन हाडा यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून नियमांचे उल्लंघन स्पष्ट आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून पुन्हा नियमबद्ध पद्धतीने राबवावी, अन्यथा शिव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा किंवा न्यायालयात दाद मागावी.
या आरोपांमुळे कोपरगावमध्ये राजकीय खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. गावात उलट-सुलट चर्चा सुरू असून काहीजण मोठा आर्थिक घोटाळा होणार असल्याचेही बोलत आहेत. नागरिक आता प्रशासनाची तात्काळ कारवाई पाहत आहेत आणि निविदा प्रक्रियेतील अनियमितता काय स्वरूपाची आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views:
2





