स्व.अजितदादांच्या कार्याची अमर स्मृती: तहसील कार्यालयाचे नामकरण व पुतळा उभारण्याची आ आशुतोष काळेंची मागणी
Immortal memory of the work of late Ajitdada: Ashutosh Kalen’s demand for naming the Tehsil office and erecting a statue
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Thu12.17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : राज्याच्या विकासयात्रेत सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेले स्व.अजित पवार हे नेहमीच समाजहिताला प्राधान्य देणारे प्रभावी नेतृत्व मानले जातात. कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासात त्यांनी केलेले योगदान अमूल्य ठरले आहे.स्व.अजितदादांच्या कार्याची अमर स्मृती: तहसील कार्यालयाचे नामकरण व पुतळा उभारण्याची आ. आशुतोष काळेंची मागणी
आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी (दि. ११) महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्व.अजितदादा पवार यांच्या नावाने कोपरगाव तहसील कार्यालयाचे नामकरण व प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे निवेदन सादर केले.
निवेदनात आमदार काळे यांनी स्पष्ट केले आहे की, स्व.अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे कोपरगाव मतदार संघाला नव्या दिशा मिळाल्या असून सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडले आहेत. त्यांच्या सहकार्यातून व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नांमुळे कोपरगाव शहरातील पंचायत समिती, न्यायालय तसेच तहसील कार्यालयाची प्रशस्त इमारत उभी राहिली असून, या इमारतींनी शहराच्या वैभवात चार चाँद लावले आहेत.
आमदारांच्या मते, “तहसील कार्यालय हे तालुक्याचे प्रशासनाचे हृदय आहे; दररोज शेकडो नागरिक येथे विविध कामांसाठी येतात. येथे स्व.अजितदादांचे नाव देऊन प्रांगणात पूर्णाकृती पुतळा उभारल्यास त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळत राहील आणि योगदानाची आठवण कायमस्वरूपी राहील.”
Post Views:
7





