गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम दामू वक्ते

गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम दामू वक्ते
ViceChairman Gautam Bank

वृत्तवेध ऑनलाईन। 8 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:15

कोपरगाव: महाराष्ट्रात अग्रगण्य गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते यांची निवड कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली.

बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर धोंडीराम वक्ते यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी मावळते उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी धोंडीराम वक्ते यांच्या नावाची सूचना मांडली. सदर सूचनेस संचालक साहेबलाल शेख यांनी अनुमोदन दिले व एकमताने धोंडीराम वक्ते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचे बँकेचे मार्गदर्शक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे, बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल बोलतांना धोंडीराम वक्ते म्हणाले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याबरोबरच स्थापन केलेल्या सर्वच सहकारी संस्था माजी आमदार अशोकराव काळे यांनी सातत्याने प्रगतीपथावर ठेवून कारखाना परिसराचा विकास साधला. हि जबाबदारी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या खांद्यावर घेवून माजी आमदार अशोकराव काळे यांचा कित्ता गिरवत गौतम सहकारी बँकेला आपल्या कुशल नेतृत्वातून प्रगतीच्या यशोशिखरावर घेवून जात आहेत. आज बँकेची परिस्थिती अतिशय चांगली असून मोठ्या प्रमाणात ठेवीदार बँकेत ठेवी ठेवत आहेत.अशा आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या गौतम बँकेच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याच्या मिळालेल्या संधीतून आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, बँकेचे मुख्य व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड, व सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचे अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पहिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page