निवडणुकीपूरते राजकारण हे बाळकडू कर्मवीर काळेंच्याकडून मिळाले-आ. आशुतोष काळे 

निवडणुकीपूरते राजकारण हे बाळकडू कर्मवीर काळेंच्याकडून मिळाले-आ. आशुतोष काळे 

संत सावता माळी  मंदिरास दहा लाख    निधी ; धामोरीकरांचा शब्द पाळला !

वृत्तवेध ऑनलाईन। 8 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 18 :15

कोपरगाव : प्रत्येक गोष्टीत राजकारण टाळून निवडणुकीपुरते राजकारण केल्यास विकास झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीपुरतेच राजकारण करून दिलेला शब्द पाळण्याचे बाळकडू मला कर्मवीर शंकरराव काळेच्यांकडून मिळाले म्हणून धामोरीकरांना संत सावतामाळी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी देऊन शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे  यांनी धामोरी येथील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

आशुतोष काळे म्हणाले, जनतेने आपल्याला ज्या उद्देशातून सत्तेच्या खुर्चीवर बसविले आहे तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकास करण्याची दुर्दम्य शक्ती असल्यास एक महिला सुद्धा गावाचा कायापालट करू शकते
हे  धामोरीच्या सरपंच जयश्री भाकरे यांनी दाखवून दिले असल्याचे गौरवोदगार यांनी व्यक्त केले. अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असेही ते म्हणाले,
धामोरी येथे १४ वित्त आयोगात  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे अंतर्गत जलशुद्धीकरण (आर.ओ.) प्रकल्प व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे व १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत वेस ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन आमदार आशुतोष काळे यांनी केले. कार्यक्रमाचे  अध्यक्ष झेडपी सदस्य  सुधाकर दंडवते होते.   
यावेळी सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, संचालक ज्ञानदेव मांजरे,  नारायण मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी,  पुंडलिक माळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, भगवान माळी, शामराव माळी, शिवाजी मांजरे, भास्करराव मांजरे, सरपंच सौ.जयश्री भाकरे, नारायण भाकरे, बाळासाहेब आहिरे, नितीन पगार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष आहिरे, बाबासाहेब वाणी, पोलीस पाटील सौ. संगीता ताजणे, पं.स.अभियंता उत्तमराव पवार, राजेंद्र दिघे, संदेश सातपुते, ग्रामविकास अधिकारी संतोष सोनवणे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page