कोरोना: चा़ंदेकसारे तीन दिवस शतप्रतिशत बंद-केशवराव होन

कोरोना: चा़ंदेकसारे तीन दिवस शतप्रतिशत बंद-केशवराव होन

सामाजिक अंतर राखा, काळजी घ्या दिला सल्ला !

वृत्तवेध ऑनलाईन। 8 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 20:25
कोपरगाव:  गेल्या दोन दिवसात चांदेकसारे येथे पाच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क व सँनिटायझरचा चा वापर करावा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी केले.
काल तीन संशयित रुग्णांचे रिपोर्ट आल्यानंतर आधीचे दोन व हे तीन असे मिळून पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चांदेकसारेत आढळून आले. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याची माहिती डॉ नितिन बडदे यांनी दिली.
गावातील कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने गाव बंद करण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आली. यावेळी माजी सरपंच केशवराव होन, संचालक आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, अँड ज्ञानेश्वर होन, डॉ गोरक्षनाथ रोकडे, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, पोलीस पाटील मीराताई रोकडे, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर अदि सह ग्रामपंचायतीचे सदस्य व कोरोना दक्षता कमिटी उपस्थित होती.शनिवार दि ८ ऑगस्ट ते सोमवार दि. १० ऑगस्ट २०२० पर्यंत संपुर्ण गावात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.सर्व दुकाने, मेडिकल, दवाखाने सोमवार पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती  ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
विनाकारण मास्क शिवाय गावात फिरणाऱ्यांवर कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली काही नागरिकावर कारवाई करण्यात आली. कोरोना संदर्भातली गावातील परिस्थिती नियंत्रणात आली तर पुढील निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे शेवटी ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page