पोलिसांना गुंगारा देऊन आरोपी पळाला

पोलिसांना गुंगारा देऊन आरोपी पळाला

Accued Run Away Police Station

वृत्तवेध ऑनलाईन | Updated:9 Aug 2020
By: Rajendra Salkar

नेवासा : अवैध दारू विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. पोलीस स्टेशन मधून पळून जाण्यात आरोपी यशस्वी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुरज कैलास परदेशी,नेवासा फाटा
असं या आरोपीचं नाव असून त्याला व
त्याचा भाऊ बादल कैलास परदेशी, या दोघांना नेवासा पोलिसांनी विचारपुस करणे व अवैद्य दारू विक्री गुन्ह्यात ताब्यात घेण्यास त्यांच्या घरी गेले असता ते पोलिसांच्या अंगावर धावून आले व शिवीगाळ दमदाटी केली आरोपींना सोबत घेऊन नेवासा पोलीस स्टेशन येथे आले असता
सुरज कैलास परदेशी, याने मोबाईल मध्ये शुटींग काढण्यास सुरवात केली व झटापट करुन मोबाईल तेथेच टाकून पोलिसांना गुंगारा देत त्या ठिकाणाहून पळ काढला. सुरज परदेशी याने पळ काढल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा शोध घेतला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page