धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, गोदावरी नदीतून साडेसहा हजार क्युसेक्स पाणी प्रवाहित

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, गोदावरी नदीतून साडेसहा हजार क्युसेक्स पाणी प्रवाहित

कोपरगाव 30.6 मिलिमीटरची नोंद

कोपरगाव :

गेल्या दोन दिवसापासून त्र्यंबकेश्‍वर इगतपुरी नाशिक, नांदूर मध्यमेश्वर परिसरात पाऊस चांगल्या प्रमाणात होत असल्याने गोदावरी नदीला सोमवारी (२९जून) दुपारी बारा वाजता साडेसहा हजार क्यूसेक्स पाणी दारणा गंगापूर धरणातून नांदूर मधमेश्वर बंधारा सोडण्यात आले,

यापूर्वी ४ व १४ जून रोजी गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले होते. तालुक्यातील जेऊर कुंभारी सरिता मापन हवामान केंद्रात सोमवारी ३०.६ मिली मिटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शेतकरी या पावसाने हवालदिल झाला आहे. त्याने केलेल्या पेरणीची काही ठिकाणी बियाणे वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत, तर दुबार पेरणी करूनही वरुणराजाने शेतकऱ्यांना पुन्हा मोठा फटका दिला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी त्यांचे बियाणे शेतातच पावसाच्या पाण्यामुळे सडून गेले आहे. गोदावरी नदीला पाणी आल्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त गोदाकाठच्या असंख्य वारकरी बांधवांनी गोदास्नानाचा आनंद घेतला. यंदा वारी नसल्यामुळे असंख्य भाविक वारकऱ्यांनी गावातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. दररोज कडक ऊन पडते घामाच्या धारांनी अंग डबडबून निघते पडलेल्या पावसाने शहरातील रस्ते गटारी स्वच्छ धुऊन गेल्या आहेत

मात्र विविध प्रभागात ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग तुंबलेले दिसत आहेत नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे साथीचे रोगाची संभावना लक्षात घेता तातडीने त्यावर उपाय योजना कराव्यात अशी नागरिकांकडून मागणी होत आहे

सोमवारी पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये तर कंसातील आकडे आजपर्यंत आहे. दारणा २४ (२०५) गंगापूर १५ (४३८), कडवा ३४ (२०८) काश्यपी ६ (२३३) भावली १०(६३३) वालदेवी ९ (१०७), गौतमी ४३ (२५१), वाकी ९(३४४) नांदूर मधमेश्वर ७१ (२२१) त्र्यंबकेश्वर ६४ (२४३), घोटी १७ (२९३), इगतपुरी १४ (६८४), देवगाव २० (२१६), ब्राह्मणगाव २८ (२९४),कोपरगाव २४ (३०८), पढेगाव १० (२५१) सोमठाणे २२ (१७७), कोळगाव ८ (१७५), शिर्डी ७ (२३२), सोने वाडी २६ (१६०), रांजणगाव ८ (२७६), चि तळी ० (२७१), राहाता ६२ (३६०) या प्रमाणे पाऊस बरसला. तर दारणा २९९२, गंगापूर २५६२, मुकणे. १६६३, काश्यपी ३२७, भावली ४८२, गौतमी धरणात २३९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली

Leave a Reply

You cannot copy content of this page