रस्त्याचे काम दर्जेदार होणार नसेल, तर बंद पडावे लागेल – सुमित कोल्हे
निधीचा अपव्यय खपून घेणार नाही
कोपरगाव :
माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या निधीचा अपव्यय झालेला चालणार नाही.सदर कामाचा दर्जा सुधारला नाहीतर काम बंद पाडावे लागेल अशी ताकीद टाकळी रस्त्याच्या ठेकेदाराला युवा नेते सुमित कोल्हे यांनी दिली. निकृष्ट रस्त्यांचा लोकांना त्रास होतो त्यामुळे आम्ही कामावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी यावेळी ठेकेदाराला सुनावले.
कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नाने अर्थ संकल्प २०१६-१६ अंतर्गत मंजुर झालेल्या प्र.ज.मा. ५ रवंदे-टाकळी-पवार गिरणी- संवत्सर या रस्त्याचे टाकळी ते टाकळी फाटा अंतिम सिलकोटचे काम सुरू असुन सदर कामाच्या दर्जाबाबत युवा नेते सुमित कोल्हे यांचेकडे आलेल्या तक्रारी नंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून सरकारी अधिकाऱ्यांसमोर ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले होते .
या वेळी शाखा अभियंता बी. बी. गाडे यांना सुचना करून सार्वजनिक बांधकाम विभागचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संवाद साधुन ठेकेदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता तपासुनच बील अदा करणे बाबत चर्चा केली.
सुमित कोल्हे यांनी काम चालु असताना भेट दिली तेव्हा त्यांच्या समवेत सरपंच राहुल देवकर, ग्रामस्थ मच्छिंद्र देवकर, सतिष देवकर, अनिल देवकर, अमोल देवकर, बापु देवकर, उपस्थित होते.
चौकट
सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी सुध्दा लागलीच श्री गाडे यांना ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामातील त्रुटी दुर करण्याच्या सुचना केल्या.
फोटो ओळी: टाकळी रोडच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर युवा नेते सुमित कोल्हे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून दर्जा सुधारण्याबाबत सुचना केल्या.