राज्य शासनाने वकीलांना आर्थिक पॅकेज द्यावे- ॲड. मनोज कडू
State government should give financial package to lawyers- Adv. Manoj Kadu
वृत्तवेध ऑनलाईन। 11 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:55
कोपरगाव : कोरोनाच्या आपत्तीमुळे वकिल बांधवांना आर्थिक अरिष्टाला समोरे जावे लागत असून शासनाने पॅकेज जाहीर करावे अशी मागणी येथील ॲड मनोज कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून याचा विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. यात विधी क्षेत्रात सेवा पुरवणार्या वकिल बांधवांचाही समावेश आहे. चार महिन्यांपासून उत्पन्न नसल्याने त्यांच्या समोर मोठे संकट उभे ठाकले आहे.वकील वर्गातील सर्व वकील गर्भश्रीमंत नसून अनेक वकील मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील आहे. लॉक डाऊन तथा न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे वकिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.वकील वर्गावर अवलंबून असलेले कोर्टातील वकिलांचे कारकून यांच्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती देखील गेल्या अनेक दिवसापासून खालावलेली आहे.या पार्श्वभूमिवर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच दिल्ली सरकारने वकिलांसाठी पॅकेज दिले, त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील वकिलांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी ॲड. मनोज कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .