अमृत संजीवनी च्या संचालकपदी विलासराव भाकरे यांची निवड.

अमृत संजीवनी च्या संचालकपदी विलासराव भाकरे यांची निवड.

Selection of Vilasrao Bhakre as Director of Amrut Sanjeevani.

वृत्तवेध ऑनलाईन। 11 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:55

कोपरगाव : धामोरी येथील युवक कार्यकर्ते विलासराव भाकरे यांची अमृत संजीवनी शुगर केन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थाच्या संचालकपदी निवड करण्यात आली. कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे हस्ते श्री भाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेवर काम करण्याची संधी दिल्याबददल श्री भाकरे यांनी आभार व्यक्त केले.
श्री भाकरे हे धामोरी येथील प्रगतीशील शेतकरी असून सामाजिक,राजकीय क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असतात. त्यांचे वडील भाउसाहेब गणपत भाकरे हे सहकारमहर्पी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते, त्यांच्या समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवत असून त्यांच्या अनुभवाचा संस्थेला निश्चित फायदा होईल. औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी पराग संधान, कार्यकारी संचालक शीवाजीराव दिवटे, राहुल वाणी, विजय साळुंके, सतीष भाकरे आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबददल माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, मा. आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page